AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गगन भरारी, ग्राहकांना झटका

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने मोठी भरारी घेतली. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) शनिवार-रविवार भाव जाहीर करत नाही. तर गुडरिटर्न्सने दरवाढ नोंदवली आहे. सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागलेला नाही. भावात सतत वाढ होत आहे. आता मौल्यवान धातूचा असा आहे भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गगन भरारी, ग्राहकांना झटका
| Updated on: Nov 26, 2023 | 8:33 AM
Share

नवी दिल्ली | 26 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीने ऑक्टोबर महिन्यात मोठी उसळी घेतली. हमास-इस्त्राईल युद्धाचे ते पडसाद होते. घसरणीवर असलेल्या मौल्यवान धातूंना या घडामोडींमुळे बळ मिळाले. अमेरिकन केंद्रीय बँकेने पण महागाईविरोधात कडत धोरण राबवले. त्याचा परिणाम दिसून आली. जागतिक गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा व्यस्त प्रमाणाचा फटका बसला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला भावात घसरण झाली. दिवाळीपासून मौल्यवान धातूंनी (Gold Silver Price Today 26 November 2023) पुन्हा महागाईचा सूर आळवला. असा आहे सोने-चांदीचा भाव

सोन्याची भरारी

दिवाळीपासून सोन्याने मोठी भरारी घेतली. या काळात सोने 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. 25 नोव्हेंबर रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुंतवणूकदारांची झाली चांदी

चांदीने या दोन आठवड्यात मोठी भरारी घेतली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 5600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. 25 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 7,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.