AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 August 2024 : सोने किंचित वधारले, तर चांदीने घेतली विश्रांती, आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 29 August 2024 : ऑगस्ट महिन्याच्या अखरेच्या सत्रात सोने आणि चांदीला मोठी झेप घेता आलेली नाही. यापूर्वी मार्च, एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी उच्चांकी कामगिरी बजावली होती. बजेटनंतर किंमतीत एकदाच मोठी उसळी आली. त्यानंतर चढउताराचे सत्र सुरु आहे.

Gold Silver Rate Today 29 August 2024 : सोने किंचित वधारले, तर चांदीने घेतली विश्रांती, आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Aug 29, 2024 | 8:30 AM
Share

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सोने आणि चांदीला मोठी झेप घेता आलेली नाही. मौल्यवान धातूच्या किंमतीत चढउताराचे सत्र सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून महागाईकडे आगेकूच करण्याचा दोन्ही धातूचा प्रयत्न फसला आहे. गेल्या आठवड्यात एकच दिवस दरवाढ झाली होती. या आठवड्यात पण दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. मौल्यवान धातूत दरवाढ आणि घसरणीचे सत्र सुरु आहे. आता अशा आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती… (Gold Silver Price Today 29 August 2024 )

सोन्याची किंमत काय

या आठवड्यात सुरुवातीला सोन्याचा दर स्थिर होता. 27 ऑगस्ट रोजी सोने घसरले. तर 28 ऑगस्ट रोजी सोने 220 रुपयांनी महागले. आज सकाळच्या सत्रात त्यात नगण्य वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत किंचित घसरण

दोन आठवड्यापासून चांदीला दरवाढीचा आलेख उंचावता आलेला नाही. गेल्या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी महागली होती. या आठवड्यात 26 ऑगस्ट रोजी चांदी 100 रुपयांनी उतरली होती. 27 ऑगस्ट रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 28 ऑगस्ट रोजी चांदीच्या किंमतीत बदल झाला नाही. 29 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,400 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,691, 23 कॅरेट 71,404, 22 कॅरेट सोने 65,669 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,768 रुपये, 14 कॅरेट सोने 41,939 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,929 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल