Gold Silver Rate Today 29 November 2024 : सोने-चांदीची वार्ता काय, दर घसरला की कापणार तुमचा खिसा, जाणून घ्या भाव

Gold Silver Rate Today 29 November 2024 : सोने आणि चांदीची काय वार्ता आहे? सोमवार आणि मंगळवारी दोन दिवस बाजारात भाव घसरला होता. त्यानंतर अचानक दर वधारला. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसून आले. लग्नसराईत सोने आणि चांदीचा आता काय आहे भाव?

Gold Silver Rate Today 29 November 2024 : सोने-चांदीची वार्ता काय, दर घसरला की कापणार तुमचा खिसा, जाणून घ्या भाव
सोने आणि किंमत
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 8:30 AM

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. ग्राहकांची सराफा बाजारात एकच गर्दी झाली. तर बुधवारनंतर सोन्याचा नूर पालटला. सोने महाग झाले. तर चांदीच्या भावात कोणताही बदल झाला नाही. देशभरात मौल्यवान धातुच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसले. गुरुवारी भाव घसरला. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातुमधील या घडामोडींमुळे ग्राहकांनी ज्या स्वस्ताई त्या दिवशी खरेदीची घाई केल्याचे दिसले. वधू आणि वराकडील मंडळींनी सुद्धा भाव कमी झाल्यावर खरेदीसाठी झुंबड केल्याचे दिसले. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 29 November 2024 )

सोन्याच्या किंमतीत चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी उतरले. तर सोमवारी 110 तर मंगळवारी त्यात 120 रुपयांची घसरण झाली होती. 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. काल त्यात 150 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा नरमाईचा सूर

गेल्या चार दिवसांपासून चांदीचा नरमाईचा सूर आहे. मागील आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली होती. या सोमवार आणि मंगळवारी मिळून 2500 रुपयांची घसरण झाली. तर बुधवारी आणि गुरूवारी किंमतीत बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रातही चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,287, 23 कॅरेट 75,981, 22 कॅरेट सोने 69,879 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,215 रुपये, 14 कॅरेट सोने 44,628 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,904 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.