AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने चमकले, चांदी पडली फिक्की, भाव तरी काय

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारात दिसून आला. सोन्याचा भाव पुन्हा वधारला. तर चांदीने दरवाढीला ब्रेक दिला आहे. ऑगस्ट महिन्यातही दोन्ही धातूंच्या दरवाढीला मोठा ब्रेक मिळाला होता. या महिन्यात सोने-चांदी किती वधारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rate Today : सोने चमकले, चांदी पडली फिक्की, भाव तरी काय
Image Credit source: Google
| Updated on: Sep 03, 2023 | 9:41 AM
Share

नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : जागतिक घडामोडी सोने आणि चांदीसाठी सध्या अनुकूल आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत सोने-चांदीने चांगली वधारली आहे. त्यापूर्वी दोन्ही धातूंना मोठी उसळी घेता आली नाही. दरवाढीला सातत्याने ब्रेक लागला. 21 ऑगस्टपासून दोन्ही धातूंनी चढाई सुरु केली. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात सोने 800 रुपयांनी वधारले तर चांदी जवळपास 4000 रुपयांनी वाढली. सप्टेंबर महिन्यात गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचे तळ्यातमळ्यात सुरु आहे. पहिल्या दिवशी दोन्ही धातूंमध्ये किंचित घसरण आली तर दुसऱ्या दिवशी सोने वधारले तर चांदीत मोठी घसरण दिसून आली. आता सप्टेंबर महिन्यात सोने-चांदी (Gold-Silver Price Today 3 September 2023) किती मुसंडी मारते हे स्पष्ट होईल. दोन्ही धातूंना अद्याप पण फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यासारखा रेकॉर्ड करता आला नाही, हे मात्र खरे आहे.

किती वधारल्या किंमती

गुडरिटर्न्सनुसार, 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 22 कॅरेट सोने 55,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,370 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीत घसरण

या महिन्यात चांदीला कमाल करता आली नाही. चांदीत किलोमागे 700 रुपयांची घसरण झाली. 1 सप्टेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची तर 2 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात 16 ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास 4000 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती.. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,489 रुपये, 23 कॅरेट 59,251 रुपये, 22 कॅरेट सोने 54,492 रुपये, 18 कॅरेट 44617 रुपये, 14 कॅरेट सोने 34,801 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,838 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा