Gold Silver Rate Today 30 November 2024 : चांदीची गरूड भरारी, तर सोन्याने घेतली उसळी, आता अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 30 November 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. लग्नसराईत दोन्ही धातुच्या भावात घसरण झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. आठवड्याच्या अखेरीस मात्र मौल्यवान धातुंनी दरवाढीचा तडका लावला.

Gold Silver Rate Today 30 November 2024 : चांदीची गरूड भरारी, तर सोन्याने घेतली उसळी, आता अशा आहेत किंमती
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 8:28 AM

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत तुफान पडझड झाली होती. जळगाव सराफा बाजारापासून ते देशातील मोठ्या सुवर्णपेठेपर्यंत भावात सलग दोन दिवस घसरण नोंदवल्या गेली. भाव उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. लग्नसराईच्या तोंडावर सोने आणि चांदीतील घसरण त्यांच्या पथ्यावर पडली. खरेदीसाठी सुवर्णपेठेत एकच गर्दी उसळली. पण बुधवारनंतर दोन्ही धातुंचा नूर पालटला. मौल्यवान धातुनी महागाईकडे कूच केली. गेल्या तीन दिवसात सोन्यात जोरदार उसळी आली तर काल चांदीने अचानक दरवाढीची हाक दिली. या घडामोडींमुळे दोन्ही धातुच्या किंमती वधारल्या. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव (Gold Silver Price Today 30 November 2024 )

सोन्याची पुन्हा उंच उडी

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 230 रुपयांची घसरण दिसली. सोमवारी 110 तर मंगळवारी त्यात 120 रुपयांची घसरण झाली होती. 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजी 150 रुपयां घसरण झाली. तर 29 नोव्हेंबर रोजी सोन्याने 760 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,760 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची गरुड भरारी

गेल्या चार दिवसांपासून चांदीने नरमाईचा सूर आळवला आहे. गेल्या आठवड्यात चांदी 2500 रुपयांनी वधारली. सोमवार आणि मंगळवारी मिळून 2500 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर दोन दिवसात किंमतीत बदल दिसला नाही. 29 नोव्हेंबर रोजी 2 हजारांनी किंमती उतरल्या. आज सकाळच्या सत्रातही चांदीत महागाईचे संकेत मिळत आहेत.. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,740, 23 कॅरेट 76,433, 22 कॅरेट सोने 70,294 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,555 रुपये, 14 कॅरेट सोने 44,893 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,383 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?
शिंदेंकडून कोणाची वर्णी अन् कोणाला डच्चू? अर्थ, गृह..बडी खाती कोणाकडे?.
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.