AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 31 January 2025 : Budget 2025 पूर्वीच सोने-चांदीचे दर जाहीर, जळगावच्या सराफा बाजारात विक्रमी झेप

Gold Silver Rate Today 31 January 2025 : Budget 2025 पूर्वीच सोने आणि चांदीत तुफान दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसात सोने हजाराहून तर चांदी 2 हजारांनी वधारली. बजेटमध्ये दोन्ही मौल्यवान धातुवरील करात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 31 January 2025 : Budget 2025 पूर्वीच सोने-चांदीचे दर जाहीर, जळगावच्या सराफा बाजारात विक्रमी झेप
सोने-चांदीची उंच उडी
| Updated on: Jan 31, 2025 | 8:32 AM
Share

Budget 2025 पूर्वीच सोने आणि चांदीच्या किंमतीत तुफान आले आहे. सोमवार-मंगळवारी किंमतीत घसरण झाल्यानंतर बुधवार आणि गुरुवारी दोन्ही धातुच्या किंमती भरघोस वाढल्या. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. बजेटपूर्वीच मौल्यवान धातुने चमक दाखवली. उद्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. बजेटमध्ये दोन्ही मौल्यवान धातुवरील करात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातुनी विक्रमी झेप घेतली आहे.  आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती, आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 31 January 2025 )

सोन्याची तुफान घोडदौड

सोन्याच्या किंमती या महिन्यात सातत्याने वाढत आहे. मध्यंतरी त्यात थोडी घसरण झाली. मागील 15 दिवसात दर 3000 रुपयांनी वधारले. तर या सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे 170 आणि 320 रुपयांची घसरण झाली. 29 जानेवारी रोजी सोन्याने 920 रुपयांचा धमाका केला. गुरुवारी सोने 170 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 76,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 83,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

ब्रेकनंतर चांदी सुसाट

जानेवारीमधील 15 दिवसात चांदी 4 हजारांनी महागली तर 2 हजारांनी स्वस्त झाली. 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. 24 जानेवारीला 1 हजारांची दरवाढ तर 27 जानेवारीला 1 हजारांची घसरण झाली. त्यानंतर 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 81,303, 23 कॅरेट 80,977, 22 कॅरेट सोने 74,474 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,977 रुपये, 14 कॅरेट सोने 47,562 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,184 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

जळगावच्या सराफा बाजारात विक्रमी झेप

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या विक्रमी उच्चांकी गाठली आहे. जळगावात जीएसटीसह सोन्याचे दर ८४ हजार १५१ रुपयांवर पोहोचले आहे. आठवडाभरापासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. बुधवारपाठोपाठ गुरुवारीही सोन्याने उच्चांकी दराची पातळी गाठली. दोन दिवसात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचे दर ८४ हजार १५१ एवढे आजवरच्या उच्चांकी पातळीवर गेले आहे.

शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरात कपात, डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत अशा कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सोने व्यावसायिकांनी दिली. जागतिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यावर परिणाम दिसून येत असल्याचे दिसते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?