AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 4 July 2024 : चांदीची तीन दिवसांत धावा धाव, तर सोन्याने घेतली माघार, काय आहेत आता बाजारातील भाव

Gold Silver Rate Today 4 July 2024 : आठवड्याच्या सुरुवातीपासून चांदीने आगेकूच सुरु ठेवली आहे. चांदीने दमदार खेळी सुरु ठेवली आहे. गेल्या तीन दिवसांत चांदी 1500 रुपयांहून वधारली. तर सोन्याने माघार घेतली आहे. अशा आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 4 July 2024 : चांदीची तीन दिवसांत धावा धाव, तर सोन्याने घेतली माघार, काय आहेत आता बाजारातील भाव
चांदी वधारली, सोने नरमले
| Updated on: Jul 04, 2024 | 9:44 AM
Share

या आठवड्यात सोने आणि चांदीने दरवाढीची नांदी दिली. जून महिन्यात दोन्ही धातूच्या आघाडीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तर जुलै महिन्यात चांदीने दरवाढीचे घौडे दामटले आहे. तर सोन्यात चढउताराचे सत्र सुरु आहे. दोन दिवसात सोन्याने दरवाढीत आघाडी घेतल्यानंतर कालपासून विश्रांती घेतली आहे. आजही सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत दिसत आहेत. अर्थात दुपारनंतर चित्र वेगळेपण असू शकते. बजेट 2024 पूर्वी सोने आणि चांदीकडे पण ग्राहकांचे लक्ष आहे. सध्या अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती (Gold Silver Price Today 4 July 2024 )

सोन्यात चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने उसळी घेतली होती. 2 जुलै रोजी सोने 110 रुपयांनी वधारले होते. तर 3 जून रोजी भावत कोणताच बदल दिसला नाही. आज सकाळी घसरणीचे संकेत दिसत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दमदार चाल

गेल्या आठवड्यात चांदीचा भाव सुस्तावला होता. चांदीला चमक दाखविता आली नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांदीने दमदार घौडदौड केली आहे. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी आणि 3 जुलै रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारले. 24 कॅरेट सोने 72,226 रुपये, 23 कॅरेट 71,937 रुपये, 22 कॅरेट सोने 66,159 रुपये झाले. 18 कॅरेट 54,170 रुपये, 14 कॅरेट सोने 42,252 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 89,698 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case :प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान