AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 November 2024 : दिवाळी सरताच सोने-चांदी जमिनीवर, किंमतीत मोठी पडझड, आता असे आहेत भाव

Gold Silver Rate Today 5 November 2024 : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. दिवाळी सरताच या धातुचा आणि सराफा बाजाराचा उत्साह ओसरला आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने या काळात मौल्यवान धातुत मोठी वाढ होत असल्याचे दिसते. आता किंमतीत इतकी घसरण झाली आहे.

Gold Silver Rate Today 5 November 2024 : दिवाळी सरताच सोने-चांदी जमिनीवर, किंमतीत मोठी पडझड, आता असे आहेत भाव
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Nov 05, 2024 | 8:28 AM
Share

या दिवाळीत लक्ष्मी पूजनाला सोने आणि चांदीने दरवाढीचा उच्चांक गाठला. सोन्याने 81 हजारांचा टप्पा ओलांडला तर चांदीने 1 लाखांचा टप्पा गाठला. ऐन दिवाळीत दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला. दोन्ही धातुनी यावेळी नव्या विक्रमाला गवसणी घातली. तरीही सराफा बाजारात ग्राहकांची भाऊगर्दी झाली होती. दिवाळीत पाडव्याला किंमतीत घसरण झाली. आता दिवळी सरताच मौल्यवान धातुनी माघार घेतली. त्यांच्या किंमतीत पडझड झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत नरमाई आली. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 5 November 2024 )

दोन हजारांच्या उसळीनंतर किंमतीत घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याने जवळपास दोन हजारांचा टप्पा गाठला. सोने 2 हजारांनी वधारले. तर त्यात 770 रुपयांची घसरण झाली. ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला भावात मोठा बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,055 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी @97,000

गेल्या आठवड्यात चांदी 2 हजारांनी वधारली. तर आठवड्याच्या अखेरीस चांदीत 3 हजारांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,518, 23 कॅरेट 78,204, 22 कॅरेट सोने 71,923 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,889 रुपये, 14 कॅरेट सोने 45,933 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,482 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच