AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्याचा रुबाब कायम, चांदीने घेतली माघार, भाव तरी काय

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारात सोन्याची पडझड होत असली तरी त्याला न जुमानता सोन्याने भारतीय बाजारात मोठी झेप घेतली. चांदीने मात्र मोठी माघार घेतली. दोन्ही धातूंमध्ये चढउतार दिसून येत आहे.

Gold Silver Rate Today : सोन्याचा रुबाब कायम, चांदीने घेतली माघार, भाव तरी काय
Image Credit source: गुगल
| Updated on: Sep 05, 2023 | 9:20 AM
Share

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : जागतिक बाजारात सोन्यात सलग दोन दिवसांपासून पडझड सुरु आहे. पण भारतीय बाजारात या महिन्यात सोन्याने मुसंडी मारली आहे. चांदीने मात्र परतीचा प्रवास सुरु केला आहे. या महिन्यात सोने उसळले तर चांदीत घसरण झाली आहे. चीनच्या खेळीमुळे जागतिक बाजारात सोन्यात घसरण सुरु आहे. तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक आता कोणते धोरण स्वीकारते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीने (Gold-Silver Price Today 5 September 2023) मोठी झेप घेतली होती. ऑगस्ट महिन्यात या दरवाढीला ब्रेक लागला. पण शेवटच्या सत्रात दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. तरीही त्यांना कोणताच रेकॉर्ड करता आलेला नाही. सप्टेंबर महिन्यात सोने उसळले असले तरी चांदी चमकली नाही. दोन्ही धातूंमध्ये चढउताराचे सत्र आहे. सोने-चांदीचा असा भाव आहे.

सोन्याची उसळी

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात सोन्याने 600 रुपयांची उसळी घेतली होती. सप्टेंबर महिन्यातही तेजीचे सत्र सुरु आहे. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भावात बदल झाला नाही. 4 सप्टेंबर रोजी भाव 100 रुपयांनी वधारले. 22 कॅरेट सोने 55,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,470 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीत घसरण

सप्टेंबर महिन्यात चांदीला कमाल करता आली नाही. 1 सप्टेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची तर 2 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 4 सप्टेंबर रोजी चांदीत किलोमागे 700 रुपयांची घसरण झाली.ऑगस्ट महिन्यात 16 ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास 4000 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती.. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 76,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,393 रुपये, 23 कॅरेट 59,155 रुपये, 22 कॅरेट सोने 54,404 रुपये, 18 कॅरेट 44545 रुपये, 14 कॅरेट सोने 34,745 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 73,298 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल