AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्यात घसरण, चांदी पण आपटली, खरेदीची मोठी संधी

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरवाढीला या महिन्याच्या पाचव्या दिवशी ब्रेक लागला. महिन्याच्या सुरुवातीलाच सोने घसरले होते. त्यानंतर सोने चमकले. चांदीत या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घसरण लागली आहे. चांदीतील ही मोठी घसरण ग्राहकांच्या पथ्यावर पडली आहे.

Gold Silver Rate Today : सोन्यात घसरण, चांदी पण आपटली, खरेदीची मोठी संधी
Image Credit source: गुगल
| Updated on: Sep 06, 2023 | 8:58 AM
Share

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत सोन्याने चांगली आघाडी घेतली. पहिल्या दिवशी सोने घसरले होते. त्यानंतर सोने उसळी घेईल असे वाटत असतानाच पाचव्या दिवशी सोन्याने माघार घेतली. सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. चांदीला या महिन्यात मोठा पल्ला गाठता आलेला नाही. 16 ऑगस्टनंतर चांदीने मोठी भरारी घेतली होती. चांदीत जवळपास 4000 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली होती. त्यानंतर चांदीत सातत्याने घसरण सुरु आहे. आता तर चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीतील (Gold-Silver Price Today 6 September 2023) घसरणीचा फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यांना स्वस्तात खरेदीची संधी चालून आली आहे.

सोन्याला ब्रेक

गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सत्रात सोने 600 रुपयांनी वधारले होते. सप्टेंबर महिन्यात तेजीचे सत्र सुरु होते. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भावात बदल झाला नाही. 4 सप्टेंबर रोजी भाव 100 रुपयांनी वधारले. पण 5 सप्टेंबर रोजी किंमतींना ब्रेक लागला. सोने 150 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,3100 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीत आपटी बार

सप्टेंबर महिन्यात चांदीला सूर सापडला नाही. पहिल्या आठवड्यात चांदीची दमछाक झाली आहे. भावात मोठी घसरण झाली आहे. 1 सप्टेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची तर 2 सप्टेंबर रोजी चांदीत 200 रुपयांची घसरण झाली. 4 सप्टेंबर रोजी चांदीत किलोमागे 700 रुपयांची घसरण झाली. घसरणीचे हे सत्र पाचव्या दिवशी कायम होते. 5 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 75,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,356 रुपये, 23 कॅरेट 59,118 रुपये, 22 कॅरेट सोने 54,370 रुपये, 18 कॅरेट 44517 रुपये, 14 कॅरेट सोने 34,723 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 72,231 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?