AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | चला की खरेदीला! सोने-चांदीत आली स्वस्ताई, इतका आहे भाव

Gold Silver Rate Today 7 February 2024 | सोने-चांदीने Valentine Week मध्ये खरेदीदारांना मोठा दिलासा दिला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने-चांदी स्वस्त झाले. या आठवड्यात एखादी महागडी भेट तुम्हाला जीवनसाथीला देता येईल. आता अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती..

Gold Silver Rate Today | चला की खरेदीला! सोने-चांदीत आली स्वस्ताई, इतका आहे भाव
Image Credit source: Google
| Updated on: Feb 07, 2024 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली | 7 February 2024 : आजपासून व्हॅलेंटाईन आठवड्याची सुरुवात होत आहे. सोमवारपासून सोने-चांदीत पडझडीला सुरुवात झाली. त्यामुळे ही घसरण प्रेमवीरांच्या पथ्यावरच पडली आहे. त्यांना आवडत्या व्यक्तीसाठी मौल्यवान वस्तू खरेदी करता येईल. त्यांना सोने-चांदीचे गिफ्ट देता येईल. त्यासाठी खिशाला झळ पण बसणार नाही. डिसेंबर 2023 मध्ये सोने-चांदीने सर्वकालीन उच्चांकी कामगिरी केली होती. तर जानेवारीमध्ये सोने 2200 रुपयांनी तर चांदीत 4400 रुपयांनी घसरले होते, तर महिन्याच्या शेवटी भाव वधारले होते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोने-चांदीत दरवाढ झाली. पण या आठवड्यात घसरणीचे सत्र सुरु आहे. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 7 February 2024)

दरवाढीनंतर आता घसरण

जानेवारी महिन्यात सोन्यात चढउताराचे सत्र असले तरी डिसेंबर 2023 सारखा सर्वकालीन उच्चांक गाठता आला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातील दरवाढ झाली. 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी तर 2 फेब्रुवारीला 160 रुपयांनी भाव वधारले. तर 3 फेब्रुवारी रोजी किंमतीत 220 रुपयांची घसरण झाली. 5 फेब्रुवारी रोजी 150 रुपयांनी भाव उतरले. 6 फेब्रुवारी रोजी भाव 220 रुपयांनी स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,890 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,140 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2 हजारांची घसरण

जानेवारीत चांदी 4400 रुपयांनी घसरली होती. तर शेवटच्या आठवड्यात 2 हजार रुपयांची उसळी घेतली. फेब्रुवारीच्या सुरुवातील चांदीत 2 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर घसरणीचे सत्र सुरु आहे. 3 फेब्रुवारी रोजी 1,000 रुपयांनी भाव उतरले. 5 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमत उतरली तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोने 62,479 रुपये, 23 कॅरेट 62,229 रुपये, 22 कॅरेट सोने 57,231 रुपये झाले. 18 कॅरेट 46,859 रुपये, 14 कॅरेट सोने 36,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,984 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.