AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7 November 2024 : सोन्याचा दरवाढीचा झेंडा तर चांदीत पडझड कायम, किंमती तरी काय?

Gold Silver Rate Today 7 November 2024 : अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्याचे वृत्त पसरताच जगभरातील शेअर बाजाराच नाही तर सराफा बाजारातही परिणाम दिसला. काल संध्याकाळी सोन्याने उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रातही दरवाढीचा झेंडा दिसून येत आहे.

Gold Silver Rate Today 7 November 2024 : सोन्याचा दरवाढीचा झेंडा तर चांदीत पडझड कायम, किंमती तरी काय?
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Nov 07, 2024 | 8:34 AM
Share

अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. त्यानंतर जगभरातील शेअर बाजार, व्यापार, सराफा बाजारांना उधाण आले. ट्रम्प हे स्वतः मोठे उद्योजक आहे. त्यांच्या उद्योगाचा पसारा संपूर्ण जगभर पसरला आहे. सराफा बाजारात संध्याकाळी सोने वधारले. तर चांदीने सपशेल माघार नोंदवली. मौल्यवान धातुनी दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला आहे. दिवाळीत त्यामध्ये चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्याच्या सुरुवातीला घसरण नोंदवण्यात आली होती. तर आता किंमत वाढली आहे. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 7 November 2024 )

या आठवड्यात चढउताराचे सत्र

गेल्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले होते. त्यात 770 रुपयांची घसरण झाली होती. या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर बुधवारी किंमत 150 रुपयांनी वाढली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची किंमत घसरली

मागील आठवड्यात चांदीत दोन हजारांची भर पडली तर तीन हजारांनी किंमती उतरल्या होत्या. या आठवड्यात चांदीत मोठा बदल दिसला नाही. तर 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी घसरली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,136, 23 कॅरेट 77,823, 22 कॅरेट सोने 71,573 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,602 रुपये, 14 कॅरेट सोने 45,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,901 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?