AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 9 March 2025 : सोन्याचे तळ्यातमळ्यात, चांदी महाग, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 9 March 2025 : सोने आणि चांदीने या आठवड्यात ग्राहकांना संभ्रमात टाकले. सुरुवातीला सोने दोन दिवस तुफान महागले. तर त्यानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. चांदी या आठवड्यात वधारली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 9 March 2025 : सोन्याचे तळ्यातमळ्यात, चांदी महाग, काय आहेत किंमती?
सोने आणि चांदीची किंमत कायImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 09, 2025 | 8:37 AM
Share

या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसात 1360 रुपयांनी सोने महागले. पण नंतर सलग सोने स्वस्त झाले. चांदी या आठवड्यात वधारली. सोन्याचे तळ्यात-मळ्यात असे धोरण दिसले. तर चांदीने ग्राहकांना अचंबित केले. गेल्या काही दिवसांपासून चांदीत चढउताराचे सत्र सुरू होते. या आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली. चांदी पुन्हा लाखाच्या उंबरठ्यावर दाखल झाली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 9 March 2025 )

सोन्यात चढउताराचे सत्र

या आठवड्यात सोमवारी 760 तर मंगळवारी 600 रुपयांनी सोने महागले होते. त्यानंतर बुधवारी 490 रुपयांनी आणि गुरुवारी 330 रुपयांनी सोने उतरले. तेव्हापासून धातुत नरमाई आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी सुसाट

या आठवड्यात 2100 रुपयांनी चांदी महागली. सोमवारी आणि बुधवारी 1,000 रुपयांनी वधारली. गुरुवारी शंभर रुपयांनी किमत वाढली. गेल्या आठवड्यात चांदी 5 हजारांनी उतरली होती. तर गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,100 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,059, 23 कॅरेट 85,714, 22 कॅरेट सोने 78,830 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,544 रुपये, 14 कॅरेट सोने 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,724 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर