Gold Rate Today | दोन दिवसांच्या भाव वाढीनंतर सोन्याच्या दरांत घसरण, जाणून घ्या आजचा नवा भाव

सलग दोन व्यापार सत्रात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत आज (18 मे) घसरण झालेली दिसत आहेत. एमसीएक्सवर (MCX) सकाळी 11.20 वाजता, जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 74 रुपयांनी घसरले आणि प्रति दहा ग्रॅम 48400 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते.

Gold Rate Today | दोन दिवसांच्या भाव वाढीनंतर सोन्याच्या दरांत घसरण, जाणून घ्या आजचा नवा भाव
सोने-चांदी दर

मुंबई : सलग दोन व्यापार सत्रात वाढ झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीत आज (18 मे) घसरण झालेली दिसत आहेत. एमसीएक्सवर (MCX) सकाळी 11.20 वाजता, जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 74 रुपयांनी घसरले आणि प्रति दहा ग्रॅम 48400 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 85 रुपयांनी घसरून 48884 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. 13 मे रोजी सोने 47,438 रुपयांवर बंद झाले होते. त्यानंतर, दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये व्यापार केल्यानंतर, 17 मे रोजी, हा भाव 48474च्या पातळीवर बंद झाला होता. दोन व्यापार सत्रात तो 1036 रुपयांनी वाढला होता (Gold Silver Rate Today on 18 May 2021 MCX rates).

दुसरीकडे चांदीच्या दरात (Silver rate) देखील वाढ दिसून येत आहे. यावेळी, जुलैच्या वितरणासाठी चांदीचा भाव 577 रुपयांनी वधारून 73901 रुपयांवर पोहोचला होता. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यात चांदीचा भाव 592 रुपयांनी वाढून 74963 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3.20 डॉलर वाढीसह 1870च्या पातळीवर व्यापार करत होता. यावेळी चांदी 0.38 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 28.65 डॉलरच्या पातळीवर व्यापार करत आहे.

सोन्याने तीन महिन्यांची उच्चांकी पातळी गाठली!

मागील काही काळासाठी होत असलेल्या तेजीमुळे सोने तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहचले होते. 10 वर्षाच्या अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे आज सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार सकाळी 11.30 वाजता, बाँड यील्ड मामुली तेजीसह 1.644 टक्के होता. डॉलरच्या निर्देशांकात किंचित घसरण झाली असून, तो 90.08 च्या निर्देशांकावर आहे. हे निर्देशांक जगातील इतर सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची कामगिरी दाखवते (Gold Silver Rate Today on 18 May 2021 MCX rates).

सोन्याच्या वाढीचे कारण काय?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन बाँडच्या उत्पन्नातील कमजोरीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याचवेळी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की, डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि अमेरिकेच्या उत्पादनात घट झाल्यामुळे सोन्याची किंमत सुमारे 3 महिन्यांच्या उंचीवर व्यापार करीत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या कमकुवत आर्थिक आकडेवारीमुळे सोन्याची वाढ झाली.

500 रुपयांत खरेदी करा प्रति 10 ग्रॅम सोने

आजपासून सॉवरेन गोल्ड बाँडची विक्री सुरू झालीय. यावेळी आरबीआयने प्रति ग्रॅम 4,777 रुपये किंमत निश्चित केलीय. डिजिटल पेमेंटवर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देखील देण्यात येणार आहे. आजपासून 21 मेपासून रोख्यांची गुंतवणूक करता येईल आणि 25 मे रोजी बॉण्ड्स दिले जातील.

(Gold Silver Rate Today on 18 May 2021 MCX rates)

हेही वाचा :

PNB ग्राहकांनो लक्ष द्या! मोबाईलमध्ये हे अ‍ॅप करा डाऊनलोड, घर बसल्या होणार सर्व कामे

SBI चा मोठा निर्णय, बुडलेल्या पैशातून मुक्त होण्यासाठी बँक 235 कोटींचं बॅड लोन विकणार