AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : चला मग खरेदीला, सोने-चांदीत झाली घसरण

Gold Silver Rate Today : या महिन्यात सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. पण गेल्या आठवड्यापासून दोन्ही धातूंना उसळी घेण्यासाठी बळ मिळालेले नाही. जागतिक घडामोडी अनुकूल नसल्याने सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला.

Gold Silver Rate Today : चला मग खरेदीला, सोने-चांदीत झाली घसरण
| Updated on: Jul 25, 2023 | 10:23 AM
Share

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : जुलै महिन्यात सोने-चांदीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतली. खरेदीदारांना त्याचा फटका बसला. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. सोन्याने म्हणता म्हणता पुन्हा 60 हजारांचा पल्ला गाठला. यापूर्वी मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूत नरमाई होती. जुलै महिन्यात दोन्ही धातूंनी मरगळ झटकली. गेल्या आठवड्याच्या शेवटी घसरणीला सुरुवात झाली. शनिवार-रविवार आणि सोमवारी धातूंमध्ये मोठा बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात किंमतीत 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यापासून दोन्ही धातूंना (Gold Silver Price Today) उसळी घेण्यासाठी बळ मिळालेले नाही. जागतिक घडामोडी अनुकूल नसल्याने सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला.

घसरणीचे सत्र

सोने आणि चांदीने जुलै महिन्यात मोठी उसळी घेतली होती. 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही. तर 25 जून रोजी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,434 रुपये, 23 कॅरेट 59,196 रुपये, 22 कॅरेट सोने 54,442 रुपये, 18 कॅरेट 44,576 रुपये, 14 कॅरेट सोने 34,769 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,190 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच...

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला.

Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर.

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश.

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार.

Live Update : सोनम वांगचुक यांच्यासाठी ठाकरे गट मैदानात; मुंबईत आंदोलन करणार