AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे घुमजाव, खरेदीची करा लगबग, अशी आली स्वस्ताई

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या घौडदौडाला ब्रेकल लागला. दोन्ही धातूंनी माघार घेतली. सोने-चांदीच्या किंमतीत दोन दिवसांत मोठी घसरण झाली. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे घुमजाव, खरेदीची करा लगबग, अशी आली स्वस्ताई
सोने-चांदीत घसरण
| Updated on: Jul 23, 2023 | 9:26 AM
Share

नवी दिल्ली | 23 जुलै 2023 : अमेरिकन बाजारातील घडामोडींचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर होत आहे. भारतीय सराफा बाजारातही त्याचे पडसाद उमटत आहे. या महिन्यात सोने-चांदीने (Gold Silver Price Today) उसळी घेतली आहे. गुंतवणूकदारांना त्यामुळे लॉटरी लागली. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीत घसरण झाली होती. सोन्याचा भाव थेट 58,000 रुपयांवर घसरला होता. तर चांदी 70,000 रुपयांपर्यंत घसरली होती. जुलै महिन्यात मात्र दोन्ही धातूंनी उचल खाल्ली. या महिन्यात सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. सोन्याने म्हणता म्हणता पुन्हा 60 हजारांचा पल्ला गाठला. पण गेल्या दोन दिवसांत दोन्ही धातूत पुन्हा घसरण दिसून आली. काय आहे सोने-चांदीचा भाव?

दोन दिवसांत भाव घसरले

सोने आणि चांदीने जुलै महिन्यात मोठी उसळी घेतली होती. 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.

आठवड्यात तीनदा घसरण

आठवड्याच्या पहिल्या दिवशी 17 जुलै रोजी किंमती 20 रुपयांनी घसरल्या होत्या. 22 कॅरेट सोने 55,130 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. 18 जुलै रोजी मोठी उलाढाल झाली नाही. तर 19 जुलै रोजी भावाने मोठी आघाडी घेतली. सोन्याने 670 रुपयांची उसळी घेतली. 20 जुलै रोजी सोन्यात 100 रुपयांची वाढ झाली. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,300 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,3 20 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,455 रुपये, 23 कॅरेट 59,217 रुपये, 22 कॅरेट सोने 54,460 रुपये, 18 कॅरेट 44,591 रुपये, 14 कॅरेट सोने 34,781 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,622 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?