AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, एफडीएचे थेट कारवाई, केएफसीमध्ये..

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात राज्यभरात कारवाई केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी खळबळजनक घटना घडली. मोठी कारवाई करण्यात आली.

तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका, एफडीएचे थेट कारवाई, केएफसीमध्ये..
Tukaram Mundhe
| Updated on: Oct 14, 2026 | 10:47 AM
Share

महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांची मोठी क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्याकडून मोठी कारवाई केली जात आहे. भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील KFC उपाहारगृहाचा अन्न परवाना FDA कडून तात्काळ निलंबित करण्यात आला. तपासणीत कच्चे-शिजवलेले आणि शाकाहारी-मांसाहारी अन्न वेगळे न ठेवल्याचे आढळले. अस्वच्छता, तापमान नियंत्रणातील त्रुटी आणि कीटक नियंत्रणाच्या नोंदी नसल्याचे उघड आले. त्रुटींची दुरुस्ती करून लेखी परवानगी मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश थेटपणे दिल्याने चांगलीच खळबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने KFC उपाहारगृहावर कारवाई केली आहे. बीड बायपासवरील शाहनूरवाडी परिसरात असलेल्या सफायर फूड्स इंडिया लिमिटेड संचलित KFC चा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. आकस्मिक तपासणीत अन्नपदार्थांची साठवण, तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळल्या.

सर्व त्रुटींची दुरुस्ती करून प्रशासनाचा लेखी पुनर्स्थापना आदेश मिळेपर्यंत उपाहारगृहाचे कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा तुकाराम मुंढे यांचा मोठा दणका म्हणावा लागेल. नवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात अन्न व प्रशासन विभाग अलर्ट मोडवर आहे. नवरात्रोत्सवात अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी 20 अन्नसुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आली. हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि तात्पुरत्या दुकानांची तपासणी केली जात आहे.

औषध विक्री केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी 5 औषध निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. बनावट औषध विक्री रोखण्यासाठी एफडीएची विशेष तयारी केल्याचे बघायला मिळतंय. भाविकांना स्वच्छ, ताजे आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी प्रशासन सतर्क मोडवर आहे. फक्त छत्रपती संभाजीनगर किंवा तुळजापूरच नाही तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात एफडीएकडून कारवाई केली जात आहे. मोठ्या हॉटेलवरही कारवाई केली जात आहे. कोणाचीही गय केली जात नाही. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचीही चर्चा रंगताना दिसली.

Follow Us
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली,
मोठी दुर्घटना टळली! डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवासी लिफ्ट मधेच अडकली, 15 मिनिटांसाठी....
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?