AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची मुसंडी, किंमतींची मोठी झेप

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा मुसंडी मारली. गेल्या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला होता. हा दबाव झुगारत दोन्ही धातूंनी झेप घेतली. किंमतीत काय झाली अपडेट?

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची मुसंडी, किंमतींची मोठी झेप
| Updated on: Jul 27, 2023 | 9:24 AM
Share

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : गेल्या आठवड्यापासून सोने-चांदी दबावाखाली होते. दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. पण जुलै महिन्यात सोने-चांदी वधारली होती. 21 जुलैपासून भाव घसरणीवर होते. त्यापूर्वीच्या 20 दिवसांत दरवाढ झाली होती. सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली होती. त्यानंतर सोन्यात एक हजारांची तर चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. भाव वधारणार नाहीत, असा अंदाज बांधल्या जात होता. पण दबाव झुगारुन सोने-चांदीचा दर (Gold Silver Price Today) वाढला. सोने 60,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. तर चांदीने पण उसळी घेतली. चांदीत 400 रुपयांची वाढ झाली. चांदी प्रति किलो 77,400 रुपयांवर पोहचली.

अशी झाली  घसरण

21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही. तर 25 जून रोजी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत पडझड

चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती आहेत.

भावांनी घेतली उसळी

गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली होती. पण 26 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्यात 150 रुपयांची दरवाढ झाली. सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर 24 कॅरेट सोन्यात 170 रुपयांची वाढ झाली. हा भाव 60,320 रुपये प्रति प्रति 10 ग्रॅम आहे. दीत 400 रुपयांची वाढ झाली. चांदी प्रति किलो 77,400 रुपयांवर पोहचली. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,692 रुपये, 23 कॅरेट 59,453 रुपये, 22 कॅरेट सोने 54,678 रुपये, 18 कॅरेट 44,769 रुपये, 14 कॅरेट सोने 34,920 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,520 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?