मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य ग्राहक आणि सराफांना फायदा होईल का, अशी माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी या विषयावर ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली (Gold Silver rate will fall after custom duty decrease).