AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोनं खरेदीचा स्वस्त मुहुर्त; एवढया रुपयांनी घसरल्या किंमती, खरेदीची करा लगबग

सोन्या-चांदीचे किंमतीत खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. आज सोने आणि चांदीचे दर कमी झाले. आज 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 50,725 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदी भावा एक किलोसाठी 60,164 रुपये इतका आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी थोडा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today: सोनं खरेदीचा स्वस्त मुहुर्त; एवढया रुपयांनी घसरल्या किंमती, खरेदीची करा लगबग
सोन्या-चांदीचे भाव उतरले Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 14, 2022 | 7:35 PM
Share

भारतीय सराफा बाजारात(Sarafa Bazar) मंगळवारी व्यापारी सत्रातील दुस-या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. ग्राहकांसाठी (Consumer) ही चांगली बातमी आहे. तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. सोन्या-चांदीचे भाव(Gold-Silver Rate) आज कमी झाले आहेत. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचे भाव आज 50,725 रुपये होते. तर 999 शुद्धतेची एक किलो चांदीचे दर 60,164 रुपये होते. तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते. शुद्धतेनुसार सोन्याच्या (Gold purity) किंमतीत पुन्हा बदल होतो. ग्राहकाला या नवीन दराप्रमाणे सोने-चांदी खरेदी करता येते. वटपौर्णिमेनिमित्त तुमच्या प्रियजनाला लाखमोलाची भेटवस्तू द्यायची असली तर आज सोन्या-चांदीचे आभुषण देऊ शकता. तुम्हाचा फायदा ही होईल आणि प्रिय व्यक्तीला बहुमुल्य भेट ही देता येईल.

काय आहेत आजचे बाजारभाव

दिवसभरात सोन्या-चांदीच्या किंमतीत दोनदा बदल होतो आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. ibjarates.com नुसार, 995 शुद्ध सोन्याचे दर आज 50,522 रुपये होते. तर 916 शुद्ध सोन्याचे भाव 46,464 रुपये आहेत. 750 शुद्ध सोने आज 38,044 रुपयांनी तर 585 शुद्ध असलेल्या सोन्याचे दर 29,674 रुपये आहेत. तर 999 शुद्ध एक किलो चांदीचे भाव 60,164 रुपयांवर आहे.

इतके स्वस्त झाले सोने-चांदी

सोन्या-चांदीचे भाव आज कमी झाले. 999 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर आज 710 रुपयांनी, 995 शुद्ध सोन्याचे भाव 707 रुपयांनी, 916 शुद्ध सोन्याच्या किंमती 650 रुपयांनी स्वस्त झाल्या. याव्यतिरिक्त 750 शुद्धतेच्या सोन्याच्या भावात 532 रुपयांनी तर 585 शुद्ध असलेल्या सोन्याच्या दरात 415 रुपयांनी तर 999 शुद्ध असलेल्या एक किलो चांदीचा विचार करता त्यात 748 रुपयांची घसरण झाली. या भावाचा विचार करता ग्राहकांना चांगला फायदा झाला आहे. ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी ही फायदेशीर ठरणार आहे.

अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी

ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते 21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते 14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते

मिस्ड कॉल द्या, भाव जाणून घ्या

ibja या संकेतस्थळावरील माहितीनुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांव्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी भाव जाहीर करण्यात येत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे किरकोळ भाव जाणून घ्यायचे असतील तर 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देता येईल. काही वेळातच एसएमएसद्वारे ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर भाव मिळतील.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.