AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rates Today : स्वस्तात सोने खरेदीची संधी! भावात जोरदार घसरण, चांदीने घेतली उसळी

Gold Silver Rates Today : आज सोन्याच्या किंमतीत घसरणीमुळे खरेदीदारांचा फायदा होणार आहे.

Gold Silver Rates Today : स्वस्तात सोने खरेदीची संधी! भावात जोरदार घसरण, चांदीने घेतली उसळी
सोन्यात घसरण
| Updated on: Jan 27, 2023 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात (Sarafa Market) आज 27 जानेवारी 2023 रोजी सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्याची किंमत 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक होती. तर चांदीचा भाव 68 हजार रुपयांपेक्षा जास्त होता. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेचे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,062 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीचा भाव (Silver Price Today) 68,350 रुपये आहे. इंडिया बुलिनय अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, (Indian Bullion And Jewellers Association) बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,138 रुपये होती. शुक्रवारी सकाळी हा भाव 57,062 झाला. शुद्धतेच्या आधारावर सोने स्वस्त झाले तर चांदीच्या किंमतींनी उसळी घेतली.

ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव घसरला. हा दर 56,834 रुपयांवर पोहचला. तर 916 शुद्ध सोने आज 52,269 रुपयांवर पोहचले. शुद्ध सोन्यात घसरण झाली. तर चांदीची किंमत वधारली.

750 शुद्ध सोन्याचे दर 42,797 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आले. 585 शुद्ध सोने आज स्वस्त झाले. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 33,381 रुपयांवर पोहचली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 68,350 रुपये होती.

भारतीय मानके संस्थेद्वारे (Indian Standard Organization-ISO) सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते.

अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात. या दोन्ही प्रकारच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते.

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. त्यामुळे अनेक सराफा दुकानदार 22 कॅरेट सोन्याची विक्री करतात.

ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक