AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीचे लोटांगण! भाव आपटले दणकण

Gold Silver Rate Today : अमेरिकन फेडरल बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेचा कित्ता गिरवला. व्याजदर जैसे थे ठेवले. त्यामुळे सोने-चांदीचे उरलेसुरले अवसान गळाले. भाव उतरल्याने 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता इतकी आहे.

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीचे लोटांगण! भाव आपटले दणकण
स्वस्ताईची वार्ता
| Updated on: Jun 16, 2023 | 9:15 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीची (Gold Silver Rate Today) झळाळी फिक्की पडली आहे. भाव दणकावून आपटले आहे. अमेरिकन फेडरल बँकेने भारतीय रिझर्व्ह बँकेचा कित्ता गिरवला. व्याजदर जैसे थे ठेवले. त्यामुळे सोने-चांदीचे उरलेसुरले अवसान गळाले आहे. जागतिक वायदे बाजारात सोन्याचे भविष्यातील सौदे कमी किंमतीवर ठरले आहेत. सोन्याच्या किंमती 21 डॉलरने स्वस्त झाल्या आहेत. सोन्याचे भाव 1948.20 डॉलर प्रति औसवर पोहचले आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती 1 हजार रुपयांनी घसरले. भाव उतरल्याने 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता इतकी आहे.

आठवड्याच्या चौथ्या दिवशी असा भाव या आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सोन्यात पुन्हा घसरण झाली. 330 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने सोने स्वस्त होऊन 58934 रुपयांवर आले. बुधवारी सोने 591 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 59264 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारी सोन्यासोबत चांदीत ही घसरण दिसून आली. गुरुवारी चांदी 1143 रुपयांनी स्वस्त झाली. एक किलो चांदीचा भाव 71062 रुपये प्रति किलोवर पोहचला. तर बुधवारी चांदी 1064 रुपयांनी महाग होऊन 73169 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी 24 कॅरेट सोने 58934 रुपये, 23 कॅरेट 58698 रुपये, 22 कॅरेट सोने 53984 रुपये, 18 कॅरेट 44201 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

आठवड्यात एक हजारांची घसरण

  1. गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीत घसरणीचे सत्र सुरु आहे.
  2. 10 जून रोजी सोन्याचा भाव 60,700 रुपये होता. त्यानंतर भाव घसरले.
  3. 10, 12 आणि 14 जून रोजी अनुक्रमे 130,100 आणि 400 रुपयांची घसरण झाली.
  4. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले
  5. 16 जून रोजी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही

पण मागणी घसरली सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही बाजाराकडे ग्राहकांची पावले वळली नसल्याचा दावा आयबीजेएने केला आहे. भावात घसरण झाली असतानाही मागणीत त्या तुलनेत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. केवळ 5-10 टक्केच मागणी वाढल्याने सराफा बाजार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.