AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीची उडाली घसरगुंडी, भाव इतके झाले कमी

Gold Silver Rate Today : सध्या सोने-चांदीच्या खरेदीचा सुवर्णकाळ आहे. गेल्या तीन दिवसांचा हिशेब लावला तर तुमच्या लक्षात येईल की किती रुपयांनी किंमती घसरल्या ते. नवनवीन विक्रम करणाऱ्या सोन्यात सध्या नरमाईचे धोरण आहे.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीची उडाली घसरगुंडी, भाव इतके झाले कमी
| Updated on: Jun 15, 2023 | 9:02 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या (Gold Silver Rate Today) दरवाढीला गेल्या दीड महिन्यांपासून मोठा ब्रेक लागला आहे. सध्या सोने-चांदीतील पडझड कायम आहे. जागतिक घडामोडींचा हा परिणाम आहे. डॉलरच्या दबावामुळे मौल्यवान धातू जमिनीवर असल्याने खरेदीची चांगली संधी आहे. सराफा बाजारात आणि वायदे बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. ऑगस्टचा वायदा घसरला आहे. तर सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत घसरण आहे. 24 कॅरेट सोने तर 60 हजारांच्या आत आले आहे. चांदीच्या किंमती पण 72 हजारांच्या घरात आल्या आहेत.

तीन दिवसांत एवढी घसरण गुडरिटर्न्सनुसार, सोने-चांदीत घसरणीचे सत्र सुरु आहे. 10 जून रोजी सोन्याचा भाव 60,700 रुपये होता. त्यानंतर भाव घसरले. 10, 12 आणि 14 जून रोजी अनुक्रमे 130,100 आणि 400 रुपयांची घसरण झाली. आज 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 60,200 रुपये झाले. हा 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे. तर चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. आज एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे. सकाळच्या सत्रातील हे दर आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी 24 कॅरेट सोने 59264 रुपये, 23 कॅरेट 59027 रुपये, 22 कॅरेट सोने 54286 रुपये, 18 कॅरेट 44448 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34669 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

मे-जूनमध्ये घसरण सध्या सोने 60,000 रुपयांच्या आतबाहेर खेळत आहे. चांदीत पण मोठी उसळी दिसलेली नाही. सोन्याचे भाव 1100 रुपयांच्या आसपास घसरले आहेत. मेनंतर जून महिन्यात पण सोने-चांदीने हेच नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या दोन्ही धातूंना नवीन रेकॉर्ड करता आलेला नाही. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने दरवाढीचे नवीन रेकॉर्ड तयार केले होते.

पण मागणी घसरली सोने-चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. तरीही बाजाराकडे ग्राहकांची पावले वळली नसल्याचा दावा आयबीजेएने केला आहे. भावात घसरण झाली असतानाही मागणीत त्या तुलनेत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. केवळ 5-10 टक्केच मागणी वाढल्याने सराफा बाजार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच