AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : नववर्षाला सोन्याची, महागाईची गुढी! चांदीने पण दिला टेकू, आजचा भाव किती

Gold Silver Price Today : आज मराठी नववर्षाला सुरुवात झाली. सोन्याने आणि चांदीने आज महागाईची गुढी उभारली आहे. सोन्याचा तोरा तर आहेच पण चांदी ही चमकली आहे. गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना एक तोळा सोन्यासाठी इतके रुपये खर्च करावे लागतील.

Gold Silver Price Today : नववर्षाला सोन्याची, महागाईची गुढी! चांदीने पण दिला टेकू, आजचा भाव किती
एक तोळ्याची किंमत किती
| Updated on: Mar 22, 2023 | 9:07 AM
Share

नवी दिल्ली : आज मराठी नव वर्षाला सुरुवात झाली. चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुद्ध सोन्याने आणि चांदीने (Gold Silver Price Today) आज महागाईची गुढी उभारली आहे. सोन्याचा तोरा तर आहेच पण चांदी ही चमकली आहे. मंगळवारी सकाळी सोन्याने युटर्न घेतला होता. पण संध्याकाळी गुढीपाडव्याचा (Gudi Padva) मुहूर्त या दोन्ही मौल्यवान धातूंनी साधलाच. सोन्याने या शनिवार-रविवारी यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. सोने रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहे. तर चांदीमधील चमक कायम आहे. 22 मार्च रोजी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा वाढ झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली. आज सकाळी हा भाव 55,150 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन 24 कॅरेट एक तोळा सोने आज स्वस्तात खरेदी करता येईल. आज हा भाव 60,150 रुपये आहे. चांदी किलोमागे 100 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 72,100 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत. आयबीजेएने अजून भाव अपडेट केलेले नव्हते. आज गुढीपाडव्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने भाव जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

सोन्याची दरवाढीची गुढी

  1. सोन्याच्या किंमती गेल्या आठवड्यात झपाझप वाढल्या.
  2. 13 मार्च रोजी सोमवारी सोने प्रति तोळा 56968 रुपये झाले.
  3. त्यानंतर गेल्या मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला.
  4. 15 मार्च रोजी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला.
  5. गेल्या गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला.
  6. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले. शनिवारी पुन्हा वाढ नोंदवली.
  7. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले.
  8. सोमवारी सोन्यात घसरण झाली. 21 मार्च रोजी सकाळी सोन्यात 540 रुपयांची घसरण झाली.
  9. 22 मार्च रोजी सकाळी वाढ होऊन एक तोळा सोन्याचा भाव 60,150 रुपये झाला.

Follow Us
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत
उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील!
Naveet Rana | उद्धव ठाकरे टोमणे मारण्यात स्पेशलाईझ, राहुल गांधी पप्पूच राहतील! नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क...
मुंबई महापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन सक्रिय? चक्क... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली!