AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने खरेदीचा चांगला मुहूर्त! खरेदीदारांची बल्ले बल्ले

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने खरेदीदारांना मोठा दिलासा दिला. या मौल्यवान धातूच्या किंमतीत सातत्याने बदलत आहे. आजचा भाव घ्या जाणून

Gold Silver Rate Today : सोने खरेदीचा चांगला मुहूर्त! खरेदीदारांची बल्ले बल्ले
जाणून घ्या भाव
| Updated on: Jun 08, 2023 | 9:10 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Price) खरेदीदारांसाठी आनंद वार्ता आणली आहे. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर सध्या चांगला मुहूर्त आहे. सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. भावात चढउतार असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून भावाच्या आघाडीवर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. किंमतीत वाढ न झाल्याने ग्राहकांची सराफा बाजारात वर्दळ वाढली आहे. भाव थेट 60,000 रुपयांच्या घरात आल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

असा झाला बदल ibjaratesनुसार, या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोने 68 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60028 रुपयांवर पोहचले. तर मंगळवारी सोन्याने 495 रुपयांची उसळी घेतली होती. सोन्याचा भाव 60096 रुपये होता. तर बुधवारी चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. चांदी 80 रुपयांनी स्वस्त होऊन 71824 रुपये प्रति किलोवर बंद झाली. मंगळवारी चांदी 442 रुपयांनी महाग होऊन 71904 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय बुधवारी 24 कॅरेट सोने स्वस्त होऊन 60028 रुपये, 23 कॅरेट 59788 रुपये, 22 कॅरेट सोने 54986 रुपये, 18 कॅरेट 45021 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35116 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

या आठवड्यात असा झाला बदल

  1. goodreturns नुसार, 1 जून रोजी सोन्यात 150 रुपयांची घसरण झाली होती.
  2. 22 कॅरेट सोने 55,850 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेटचा भाव 60,930 रुपये पोहचला.
  3. 2 जून रोजी सोन्याने मुसंडी मारली. सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले
  4. 3 जून रोजी सोन्यात मोठी पडझड झाली. सोने 700 रुपयांनी आपटले
  5. 4, 5 जून रोजी भावात मोठा बदल झाला नाही
  6. 6 जून रोजी भावात प्रति 10 ग्रॅम 300 दरवाढ झाली

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.