AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूशखबर! धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या मार्ग कोणता?

डिजिटल सोन्याची खरेदी फिजिकल सोन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. फिजिकल सोन्यात तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने किंवा बार किंवा क्वाईन खरेदी करता आणि त्यांचा वापर करता, पण इथे तसे नाही. आपण येथे डिजिटल सोन्याला फिजिकल स्पर्श करू शकत नाही. सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची चिंता नाही, कारण इथे सोने शुद्ध आहे.

खूशखबर! धनत्रयोदशीला फक्त 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या मार्ग कोणता?
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 5:13 PM
Share

नवी दिल्ली : भारतीयांना धनत्रयोदशी 2021 किंवा दिवाळीनिमित्त सोने खरेदी करायला आवडते. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयातही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Google Pay, Paytm, PhonePe यांसारख्या अनेक मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्मवर 1 रुपयात सोने खरेदी करू शकता.

डिजिटल सोन्याची खरेदी फिजिकल सोन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी

डिजिटल सोन्याची खरेदी फिजिकल सोन्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. फिजिकल सोन्यात तुम्ही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने किंवा बार किंवा क्वाईन खरेदी करता आणि त्यांचा वापर करता, पण इथे तसे नाही. आपण येथे डिजिटल सोन्याला फिजिकल स्पर्श करू शकत नाही. सोन्याची शुद्धता किंवा सुरक्षेची चिंता नाही, कारण इथे सोने शुद्ध आहे. गेल्या काही वर्षांत डिजिटल सोने गुंतवणुकीचे प्रमुख माध्यम म्हणून उदयास आलेय.

तुम्ही तुमच्या फोनवरून सोने खरेदी करू शकता

Google Pay प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला लॉगिन केल्यानंतर खाली स्क्रोल करावे लागेल आणि गोल्ड आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर मॅनेज युवर मनीमध्ये गोल्ड बायचा पर्याय निवडावा लागेल. येथे तुम्ही एक रुपयामध्येसुद्धा डिजिटल सोने खरेदी करू शकता. तसेच 3% जीएसटी भरावा लागेल. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर 5 रुपयांचे डिजिटल सोने खरेदी केले, तर तुम्हाला 0.9 मिग्रॅ मिळेल. खरेदी व्यतिरिक्त सोन्याला विक्री, वितरण आणि भेटवस्तू यांचाही पर्याय मिळेल. जेव्हा तुम्हाला सोने विकावे लागते, तेव्हा तुम्हाला सेल बटणावर क्लिक करावे लागते. गिफ्टसाठी गिफ्टचा पर्याय निवडावा लागतो.

तुम्ही पेटीएमवरही सोने खरेदी करू शकता

तुम्ही तुमच्या पेटीएमच्या पर्यायावर जा आणि पेटीएमगोल्डच्या पर्यायावर क्लिक करा. PhonePe वरून सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला Mymoney वर क्लिक करावे लागेल.

संबंधित बातम्या

‘या’ NBFC मध्ये FD खाते उघडल्यास 6.5%पर्यंत व्याज मिळणार, क्रेडिट रेटिंगदेखील सर्वोत्तम

सप्टेंबर तिमाहीत येस बँकेच्या नफ्यात वाढ, 225 कोटींची कमाई

Gold Rate Today Good news! Buy gold for only Rs 1 on Dhantrayodashi 2 november 2021, find out which way?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.