AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! महागाई भत्ता इतका वाढणार

7th Pay Commission : लवकरच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मोठं गिफ्ट देऊ शकतं. कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतका महागाई भत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! महागाई भत्ता इतका वाढणार
| Updated on: Jun 06, 2023 | 1:48 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच आनंदवार्ता येऊन धडकू शकते. या कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस पडू शकतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता (7th Pay Commission DA Hike) मिळत आहे. जुलै 2023 पासून केंद्र सरकार महागाई भत्ता लागू करण्याची दाट शक्यता आहे. याविषयीची घोषणा दोन महिन्यांनी होण्याची पण शक्यता आहे. आतापर्यंत आलेल्या AICPI इंडेक्स नुसार, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीएमध्ये वाढ होऊन तो 46 टक्के होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारीपासून डीए लागू करण्यात आला आहे. महागाई भत्त्यासाठी 3 महिन्यांचे आकडे हाती येतील आणि महागाई भत्ता किती वाढेल हे स्पष्ट होईल.

4 टक्के वाढ अजून मे आणि जून महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांची AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आकडेवारी येणे बाकी आहे. जर हे आकडे वाढले तर महागाई भत्ता पण वाढेल. 4 टक्के डीए वाढल्यास वार्षिक 1,68,636 रुपयांचा फायदा होईल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुलै 2023 मध्ये महागाई भत्त्यात 4% वाढ होऊन डीए 46% होईल.

AICPI अशी वाढ यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत फेब्रुवारी महिन्यात AICPI चे आकडे घसरले होते. इतर महिन्यात हा आकडे सातत्याने वाढत होते. जानेवारी 2023 मध्ये AICPI इंडेक्स 132.8 अंक होता. फेब्रुवारीत तो 132.7 टक्क्यांवर घसरला. एप्रिल महिन्यात AICPI इंडेक्स 134.02 अंकावर पोहचला.

AICPI निर्देशांकावर सर्व गणित कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनवेळा महागाई भत्ता देण्यात येतो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता लागू करण्यात येतो. पण प्रत्येक वर्षी डीएची घोषणा उशीरा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते.

5400 रुपये पे-बँडवर किती डीए मे आणि जून महिन्याच्या AICPI इंडेक्‍स जर 134.8 अंक राहिल्यास महागाई भत्ता वाढून 46 टक्के होईल. जर पे-बँड 5400 रुपयांवर महागाई भत्ता किती असेल? तर वार्षिक पगारात 14,664 रुपयांचा फायदा दिसेल. 5400 रुपयांच्या पे-बँडचे मुळ वेतन 30,550 रुपये आहे. त्यावर 42 टक्क्यांच्या आधारावर सध्या वार्षिक 1,53,972 रुपये डीए मिळत आहे. पण यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्यास दर महिन्याला 14,053 रुपये वाढतील आणि वार्षिक महागाई भत्ता 1,68,636 रुपये होईल.

वर्षांतून होते दोनदा वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते. दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ