केस गळतीवर आयुर्वेदात हा रामबाण उपाय; पतंजली रिसर्चचा दावा जाणून घ्या

Hair Fall Treatment : बदलती जीवनशैली आणि फास्टफूडच्या या जमान्यात केस गळती आणि टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे. पतंजलीने या वाढत्या समस्येवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णांच्या डोक्यावर नवीन केस उगवल्याचे दिसून आल्याचा दावा आहे.

केस गळतीवर आयुर्वेदात हा रामबाण उपाय; पतंजली रिसर्चचा दावा जाणून घ्या
केस गळतीवर मोठा उपाय
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Edited By: | Updated on: May 06, 2025 | 10:19 AM

बदलती जीवनशैली आणि फास्टफूडच्या जमान्यात अनेकांना केस गळतीची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे ऐन तारुण्यातच काहींवर ‘बाला’ होण्याची वेळ आली आहे. त्यावर पतंजलीने एक रामबाण उपाय शोधला आहे. या नवीन उपचार पद्धतीमुळे केस गळती थांबणार आहे. इतकेच नाही तर गळती झालेल्या ठिकाणी नवीन केस सुद्धा उगवण्याचा दावा करण्यात आला आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या टीमने अनेक रुग्णांवर 6 आठवड्यांपर्यंत संशोधन केले. या संशोधनादरम्यान त्यांच्यावर विविध पद्धतीने उपचार करण्यात आले. त्यात अनेकांची केस गळती थांबली. इतकेच नाही तर तिथे नवीन केस सुद्धा उगवले. पतंजलीने ही उपचार पद्धत नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसनमध्ये प्रकाशित केली आहे.

पतंजली रिसर्चचा दावा काय

पतंजलीकडून काही रुग्णांची निवड करण्यात आली. त्यांची केस गळती होत होती. डोक्यासह शरीरावरील इतर ठिकाणचे केस सुद्धा झपाट्याने गळत होते. या रुग्णांवर विविध पद्धतीने उपचार करण्यात आली होती. पण त्याचा काही फायदा झाला नाही. एलोपेसिया एरीटा नावाच्या या रोगाचा प्रभाव दिसून आला. त्यांच्यावर पतंजली रिसर्चने उपचार केले.

आयुर्वेदिक पद्धतीने वात आणि पित्त यामुळे ही केस गळती होत असल्याचे समोर आले. सदर रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्यावर शोधन, शमन आणि उपचार अशी पद्धत वापरण्यात आली. पुढील 6 आठवड्यात रुग्णांच्या डोक्यावरील केस गळती थांबलीच नाही तर त्यांच्या डोक्यावर नवीन केस सुद्धा उगवले.

6 आठवडे चालले उपचार

ज्या रुग्णांनी यापूर्वी विविध पद्धतीने उपचार करून घेतले, सुरुवातीच्या फायद्यानंतर त्यांची केस गळती थांबली नव्हती. या रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णांवर 6 आठवडे उपचार करण्यात आले. त्यांच्यावर पतंजली रिसर्चमध्येच उपचार करण्यात आले. त्यांच्यावर नियमीतपणे पंचकर्म विधी ते शोधन थेरपीचा वापर करण्यात आला. याशिवाय या रुग्णांना तोंडावाटे आणि नाकावाटे औषध देण्यात आले. त्यांच्या डोक्यावर तेल मालीश करण्यात आली. त्यानंतर या रुग्णांच्या डोक्यावर आणि शरीरातील इतर भागांवर नवीन केस उगवल्याचे दिसून आले. वात आणि पित्त नियंत्रित करून उपचार करण्यात आले. त्यामुळे केस गळतीची समस्या दूर झाली. त्याठिकाणी नवीन केस उगवणे सुरू झाले. या उपचार पद्धतीने पुढे सुद्धा संशोधन सुरू ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.