AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर मार्केटला तेजीचे धुमारे, बाजार रचेल का इतिहास 

Share Market : शेअर बाजाराला तेजीचे धुमारे फुटले आहे. बाजाराने गेल्या दोन वर्षांत मोठी झेप घेतली. तर यंदा सेन्सेक्समध्ये तुफान तेजी दिसली. या दीड महिन्यात तर जणू जादूच झाली. बाजाराची घौडदौड 70 हजार अंकाकडे सुरु आहे. हा रेकॉर्ड लवकरच तुटण्याची शक्यता आहे. त्यामागील कारणं तरी काय..

Share Market : शेअर मार्केटला तेजीचे धुमारे, बाजार रचेल का इतिहास 
| Updated on: Jul 19, 2023 | 4:47 PM
Share

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : भारतीय शेअर बाजार (Share Market) आणि गुंतवणूकदारांसाठी सध्या सुवर्णयुग उवतरले आहे. गेल्या दोन वर्षात बाजाराने मोठा पल्ला गाठला आहे. बाजाराला नवनवीन धुमारे फुटत आहे. शेअर्सला पण कोंब फुटले आहे. बाजारात तेजीचे सत्र आहे. या वर्षात बाजाराने मोठी आगेकूच केली. तर या महिन्यात शेअर बाजाराने मोठी मुसंडी मारली. सेन्सेक्सने यापूर्वीचे रेकॉर्ड मोडीत काढले. याच महिन्यात चार वेळा बाजाराने मोठा पल्ला गाठला. जुलै महिन्याच्या 13 व्यापारी दिवसात सेन्सेक्सने 3.70 टक्क्यांची झेप घेतली. बुधवारी दुसऱ्या दिवशी सेन्सेक्सने 67 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. 67117.05 अंकांचा नवीन उच्चांक गाठला. सेन्सेक्स (BSE Sensex) लवकरच 70 हजार अंकांचा तर निफ्टी (NSE Nifty) 20 हजार अंकांचा टप्पा ओलांडेल असा विश्वास तज्ज्ञांना आहे.

परदेशी गुंतवणूकदारांची भाऊगर्दी

परदेशी गुंतवूकदारांची भाऊगर्दी सध्या भारतीय शेअर बाजारात झाली आहे. NSDL च्या आकडेवारीनुसार, 18 जुलैपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये 34,444 कोटी रुपये गुंतवले आहेत. सलग पाचव्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारावर विश्वास दाखवला आहे. 2023 पर्यंत परदेशी पाहुण्यांनी 1.10 लाख कोटींची गुंतवणूक केली. तर जानेवारी आणि फेब्रुवारीत त्यांनी पैसा काढला होता. जानेवारीत 28,852 कोटी आणि फेब्रुवारीत 5,294 कोटी रुपये बाजारातून काढण्यात आले.

परदेशी पाहुण्यांचे प्रेम कशासाठी

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने महागाई आटोक्यात आणण्यासाठी आक्रमक धोरण अंगिकारली. गेल्या वर्षभरात तर बँकेने काटेकोर पालन केले. त्यामुळे महागाईचा भडका उडाला नाही. महागाई असली तरी ती नियंत्रणात आहे. या धोरणाचा अमेरिकेवरच नाही तर जगभर परिणाम दिसून आला. गुंतवणुकीवर जादा परतावा मिळणार नसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी आशिया बाजाराकडे मोर्चा वळवला आहे.

रुपयाचा डंका

शेअर बाजाराच्या तेजीला कारणीभूत दुसरे महत्वाचे इंडिकेटर म्हणजे रुपयाची तेजी. केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन करण्यासाठी अनेक धोरणं राबविली आहे. युपीआय पेमेंट सिस्टिमचा अंगिकार जगातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांनी केला आहे. तर डिजिटल रुपयांचा डंका पण वाजला आहे.

रुपयात तेजीचे सत्र

रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झाला आहे. रुपयात तेजीचे सत्र सुरु आहे. डॉलरच्या तुलनेत 0.67 टक्क्यांची तेजी दिसून आली. लवकरच रुपया डॉलरच्या तुलनेत 81 रुपयांवर येईल असा दावा तज्ज्ञ करत आहेत. सध्या हा भाव 82 रुपये असा आहे.

Kolhapur Rain

पावसाने बदलवले चित्र

मान्सून सक्रिय झाल्याने भारतात खरीप आणि रब्बीचा चांगला हंगाम येण्याची शक्यता बळावली आहे. यापूर्वी मुसळधार पावसाने उत्तर भारताला झोडपले. पण उर्वरीत भारतात मान्सून सक्रिय झाला नव्हता. पण आता दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पीकपाणी चांगले राहण्याची शक्यता आहे.

परदेशी बाजाराची उसळी

परदेशी बाजाराने उसळी घेतली आहे. त्याचा भारतीय बाजाराला फायदा होत आहे. डाऊ जोंस गेल्या एका महिन्यापासून 2.50 टक्के तेजीसह वधारला. तर गेल्या 6 महिन्यात त्यात जवळपास 6 टक्क्यांची तेजी दिसून आली. S&P 500 हा निर्देशांक गेल्या 6 महिन्यात 17 टक्क्यांची तेजी दिसून आली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.