AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC बँकेचे कर्ज महागले, व्याजदर वाढल्याने भरावे लागेल जास्त EMI

HDFC बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यामुळे ग्राहकांच्या खिशावरचा ताण वाढला आहे. कर्जाचा हप्ता आता पूर्वीपेक्षा जास्त भरावा लागणार आहे.

HDFC बँकेचे कर्ज महागले, व्याजदर वाढल्याने भरावे लागेल जास्त EMI
एचडीएफसी बँक Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 01, 2022 | 7:49 AM
Share

मुंबई,  HDFC बँकेने त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे. यामुळे कंपनीच्या गृहकर्जाचा ईएमआय वाढणार आहे. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. देशातील सर्वात मोठ्या हाऊसिंग फायनान्स कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, HDFC ने गृहकर्जावर (Home Loan) रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) वाढवला आहे, ज्यावर त्याचे ॲडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) बेंचमार्क आहे. कंपनीने सांगितले की त्यांनी 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर केली आहे, जी 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होईल.

गेल्या पाच महिन्यांत सातव्यांदा दरवाढ

एचडीएफसीने गेल्या पाच महिन्यांत सातव्यांदा कर्जदरात वाढ केली आहे. आरबीआयने शुक्रवारी मुख्य धोरण दर 50 बेसिस प्वॉइंट्स वाढवल्यानंतर, इतर बँका आणि वित्तीय संस्थां देखील त्यांच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होतेच.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. एप्रिल 2019 नंतरचा हा या दराचा उच्चांक आहे. या समितीमध्ये आरबीआयचे तीन सदस्य आणि तीन बाह्य तज्ज्ञांचा समावेश आहे. सहापैकी पाच सदस्यांनी दरवाढीच्या बाजूने मतदान केले.

RBI ने आर्थिक धोरणात काय म्हटले आहे?

ऑगस्टमध्ये महागाई 7 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मध्यवर्ती बँक दरांबाबत कठोर भूमिका घेतील अशी अटकळ बांधली जात होती. यापूर्वी फेडरल रिझर्व्हनेही व्याजदरात झपाट्याने वाढ केली होती. त्यानंतर जगभरातील केंद्रीय बँकांनीही ठोस पाऊले उचलली.

गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार, या पावलांमुळे आगामी काळात महागाई कमी होण्याची अपेक्षा आहे आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च दरम्यान महागाईचा दर 6 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, जो सध्या 7 टक्क्यांच्या पातळीवर आहे. रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे की जानेवारी ते मार्च दरम्यान महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या समाधानकारक मर्यादेत येईल.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.