लाखभर पगाराची नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीत रमला; वाचा, देशातील सर्वात मोठ्या वाईन कंपनीच्या मालकाची यशोगाथा!

आज सुलाने देशातील 65 टक्के वाईन मार्केट ताब्यात घेतले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस सुला फेस्टचे आयोजनही केले जाते. (He quit his job with a salary of lakhs and start wineyard; Read the success story of Rajiv Samant)

लाखभर पगाराची नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीत रमला; वाचा, देशातील सर्वात मोठ्या वाईन कंपनीच्या मालकाची यशोगाथा!
देशातील सर्वात मोठ्या वाईन कंपनीच्या मालकाची यशोगाथा!

नाशिक : कोरोना महामारीमुळे देशाच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. या साथीचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रातील नाशिक येथे सुला वाईनयार्डवर झाला. सुला हा भारतातील सर्वात मोठा वाईन ब्रँड आहे. या वाईनला परदेशातही खूप मागणी आहे आणि नाशिकमधील अनेक हजार एकर क्षेत्रात पसरलेला वाईनयार्ड लोकांना आकर्षित करते. (He quit his job with a salary of lakhs and start wineyard; Read the success story of Rajiv Samant)

कशी झाली सुरुवात?

सुला वाईनयार्डची सुरुवात 1999 मध्ये मुंबईपासून 180 किमी अंतरावर असलेल्या नाशिक येथे झाली. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पदवीधर आणि पदव्युत्तर राजीव सामंत यांनी या वाईनयार्डची सुरूवात केली. राजीव सामंत यांनी अमेरिकेच्या प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. मग येथून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. कॅलिफोर्नियामध्ये ओरॅकल बरोबर काम करणाऱ्या राजीवला अमेरिकेच्या धावपळीचं जीवन आवडत नव्हतं आणि खेड्यात राहण्याचा निर्णय घेत राजीव भारतात परतले.

याआधी आंबा आणि गुलाबाची केली शेती

राजीव यांनी आंबा लागवडीपासून गुलाब, सागवान लाकूड आणि द्राक्षाची शेती याआधी केली. नाशिकजवळील दिंडोरी गावात त्यांच्या कुटुंबाची 20 एकर जमीन होती.
सन 1996 मध्ये, नाशिकचे हवामान व येथील जलवायू वाईन बनविणार्‍या द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे राजीव यांना उमजले. यानंतर, जेव्हा ते कॅलिफोर्नियाला परत गेले तेव्हा त्यांनी प्रसिद्ध वाईनमेकर कॅरी डॅमस्की यांची भेट घेतली. कॅरी यांनी वाईनयार्ड सुरू करण्यास मदत करण्याचे आश्वासन राजीव यांना दिले होते. यानंतर राजीव ऑरेकलमधील नोकरी सोडून भारतात परतले.

9 हजार टन द्राक्षापासून बनविली जाते वाईन

राजीव यांनी सुला आपली आई ‘सुलभा’च्या नावाने सुरू केली होती. पुढच्या काही वर्षांत कंपनीचा व्यवसाय वाढला आणि राजीवने द्राक्षांची नवीन व्हरायटीची लागवड करण्यास सुरवात केली. पुढील एक दशकाच्या आत नाशिक विभाग पूर्णपणे बदलला आणि आज तो भारताची ‘नापा व्हॅली’ म्हणून ओळखला जातो. 20 एकर क्षेत्रात सुरू झालेली ही वाईनयार्ड आज 1800 एकर परिसरात पसरली आहे.

सुला वाईनयार्डमध्ये दररोज 8 ते 9 हजार टन द्राक्षे क्रश करुन वाईन तयार केली जाते. वाईनयार्डचे मुख्य वाईन निर्माता करण वसानी यांच्या म्हणण्यानुसार येथे व्हाईट आणि रेड वाईन तयार केली जाते. नाशिक हा महाराष्ट्राचा असा भाग आहे जेथे पावसाळ्यात साप येणे सामान्य बाब आहे. पण आता सुलाने याला एक नवी ओळख दिली आहे.

500 कोटींची आहे उलाढाल

येथे येणार्‍या लोकांना केवळ वाईन विकत घेण्याची संधीच मिळत नाही तर ती वाईन कशी तयार करावी हे देखील शिकता येते. येथे येणाऱ्या पर्यटकांना वाईन टेस्टसाठी देण्यात येते. राजीव सामंत यांनी सुरू केलेल्या या वाईनयार्डची उलाढाल 500 कोटी रुपयांपर्यंत आहे. आज सुलाने देशातील 65 टक्के वाईन मार्केट ताब्यात घेतले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस सुला फेस्टचे आयोजनही केले जाते. अलिकडेच सुलाने तिची प्रतिस्पर्धी यॉर्कही विकत घेतली आहे आणि सिंगापूरमध्ये पाऊल ठेवले आहे. याशिवाय सुला ऑस्ट्रेलियामध्ये निर्यात केली जात आहे. (He quit his job with a salary of lakhs and start wineyard; Read the success story of Rajiv Samant)

इतर बातम्या

गोल्ड एक्सचेंज म्हणजे काय?, भारतात कधी उघडणार अन् त्याचा फायदा काय?

Mumbai rains and weather update : मुंबईत 24 तासात अतिवृष्टीची शक्यता, 120 किमी वेगाने वारं वाहणार