AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger : सरकारी कंपनीचा शेअर रंपाट.. 11 महिन्यांतच दुप्पट रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल, तेजीचे सत्र राहणार कायम

Multibagger : या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना वर्षभरातच मालामाल केले आहे.

Multibagger : सरकारी कंपनीचा शेअर रंपाट.. 11 महिन्यांतच दुप्पट रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल, तेजीचे सत्र राहणार कायम
जोरदार परतावाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 25, 2022 | 5:20 PM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) प्रचंड उलथापालथ सुरु असते. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल (Quarter Result) आले आहेत. अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना (Investors) बोनस शेअर, स्पिल्ट शेअर, लाभांश देऊन त्यांचा कंपनीवरील विश्वास सार्थ ठरविला आहे. त्यात सरकारी कंपन्याही (Government Company) मागे नाहीत. सरकारी कंपन्यांनीही गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

भारत सरकारची कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Ltd) या शेअरने मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी नवीन विक्रम केला. NSE वर दिवसभरातील व्यापारी सत्रात HAL च्या शेअरने भरारी घेतली.

HAL च्या शेअर 2.8 टक्क्यांनी उसळी घेतली. हा शेअर 2,737 रुपयांवर पोहचला. हा त्याचा उच्चांकी स्तर आहे. यासोबतच HAL चा शेअर त्या नामांकित शेअरच्या पंक्तीत जाऊन बसला, ज्यांनी यावर्षी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

HAL च्या शेअरने यावर्षी केवळ 11 महिन्यातच 100 परतावा दिला आहे. या शेअरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. कोरोनानंतर निर्बंध हटले. अनेक कंपन्यांनी उत्तुंग कामगिरी केली. त्यात सरकारी कंपन्याही मागे नाहीत.

यावर्षी 2022 च्या सुरुवातीला HAL चा शेअर NSE वर 1233 रुपये होता. त्यानंतर या शेअरने मागे वळून पाहिलेच नाही. चढ-उताराचे सत्र पार करत हा शेअर रंपाट झाला. सूसाट वेगाने धावणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले.

अवघ्या 11 महिन्यातच या शेअरने 100 परतावा दिला. हा शेअर वर्षाच्या सुरुवातीला 1233 रुपये होता. आता सर्व रेकॉर्ड मोडत हा शेअर 2,737 रुपयांवर पोहचला आहे. या शेअरमध्ये जवळपास 120 रुपयांची तेजी दिसून आली.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षाच्या सुरुवातीला या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला दुप्पट परतावा मिळाला असता. एक लाख रुपयांचे मूल्य 2.20 लाख रुपये झाले असते.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?