AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : एका झटक्यात गुंतवणूकदारांनी कमावले 3 लाख; 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर

Hariom Atta IPO : या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला. 16 मे 2024 रोजी कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी बाजारात दाखल झाला होता. 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर पोहचला. गुंतवणूकदारांना तुफान फायदा झाला.

Share Market : एका झटक्यात गुंतवणूकदारांनी कमावले 3 लाख; 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर
या कंपनीची मोठी भरारी
| Updated on: May 25, 2024 | 9:17 AM
Share

शेअर बाजारात आणखी एक कंपनी सूचीबद्ध झाला. हा शेअर बाजारात येताच गुंतवणूकदारांनी भांगडा केला. त्यांना पहिल्याच दिवशी जबरदस्त फायदा झाला. हरिओम आटा हा ब्रँड बाजारात लोकप्रिय आहे. या ब्रँडची एचओएसी फुड्स लिमिटेड (HOAC Foods India Limited) ही मुळ कंपनी आहे. हा शेअर 206 टक्क्यांनी सूचीबद्ध झाला. कंपनीचा शेअर 147 रुपयांवर सूचीबद्ध झाला. या शेअरचा प्राईस ब्रँड 48 रुपये प्रति शेअर होता. पहिल्याच दिवशी हरिओम आटा शेअरने गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला. 16 मे 2024 रोजी कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी बाजारात दाखल झाला होता. 48 रुपयांचा शेअर 147 रुपयांवर पोहचला.

गुंतवणूकदारांना बम्पर कमाई

  • गुंतवणूकदारांना 3000 शेअरचा लॉट खरेदी करायचा होता. हा लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 1,44,000 रुपये खर्च आला. ज्या गुंतवणूकदारांनी एक लॉट खरेदी केला. त्यांना आता 2,96,640 रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यासाठी एकूण गुंतवणूक 4 लाख 40 हजार 640 रुपये झाली असेल.
  • एचओएसी फुड्स इंडिया लिमिटेडचा शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर घसरला. कंपनीचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. शेअरची किंमत 147 रुपयांहून घसरुन 139.65 रुपयांवर आला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज SME प्लॅटफॉर्मवर हा शेअर लिस्ट झाला.

काय करते ही कंपनी?

हरिओम नावाने ही कंपनी पीठ, डाळी, मोहरीचे तेल, मसाले आणि इतर अन्नपदार्थांची विक्री करते. HOAC Foods India मध्ये आयपीओ बाजारात दाखल होण्यापूर्वी प्रमोटर्सची भागीदारी 99.99 टक्के होता. बाजारात हा शेअर सूचीबद्ध होताच हा वाटा 69.95 टक्क्यांवर आला. उत्तर भारतात या कंपनीचे आऊटलेट्स पण आहेत. या कंपनीने बाजारात येताच धमाका केला. गुंतवणूकदारांना तिप्पट परतावा दिला. एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांना तिप्पट रिटर्न मिळाला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.