Home Loan : कर्जदार असाल तर रहा खबरदार, ही एक चूक पडेल महागात! लाखोंचा बसेल फटका

Home Loan : कर्ज घेतले असेल तर आता सावध रहा, कारण आता एक चूकही तुम्हाला लाखोंचा फटका देऊ शकते..

Home Loan : कर्जदार असाल तर रहा खबरदार, ही एक चूक पडेल महागात! लाखोंचा बसेल फटका
EMI कमी करण्याचा फटका
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 11, 2022 | 7:27 PM

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात वित्तीय धोरण समितीने रेपो दरात (Repo Rate) वाढीची शिफारस केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ झाली. मे महिन्यानंतर आरबीआयने रेपो दरात चार वेळा वाढ केलेली आहे. बँकेने यावर्षात रेपो रेटमध्ये 1.90 टक्क्यांची वाढ केली आहे.

आरबीआयच्या निर्णयानंतर बँकांनीही कर्जावरील व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा हप्ता वाढला. लहान आणि मोठ्या सर्वच बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने नवीन कर्जेही महागली आहेत. दरमहाच्या EMI पूर्वीपेक्षा वाढला आहे.

आता वाढलेला ईएमआय कमी करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यांना वाढीव ईएमआय कमी करायचा आहे. त्यासाठी त्यांनी कर्जाचा कालावधी वाढविण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण ही चूक त्यांना चांगलीच महागात पडू शकते.

ग्राहकांनी ईएमआय कमी केला तर त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होईल. कारण त्यामुळे त्यांचा ईएमआय तर कमी होईल, पण पुढील कालावधीसाठी त्यांना मोठी रक्कम परतफेड करावी लागेल. त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होईल.

ईएमआयचा भार कमी करण्याच्या नादात एकूण आर्थिक बोजा वाढवून घेण्याची चूक ग्राहक करतात. बरेच ग्राहक मासिक EMI कमी ठेवण्याच्या नादात पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. ग्राहकांना हा नुकसानीचा सौदा लक्ष्यात येत नाही.

ईएमआय कमी ठेवण्यासाठी ही कसरत मोठे आर्थिक नुकसान करणारी ठरते. 20 वर्षांसाठी कर्ज कालावधी असताना ग्राहक हा कालावधी 25 वा कधी कधी 30 वर्षे ही करतात. त्यामुळे दरमहिन्याचा ईएमआयचा बोजा कमी होतो. पण एकूण व्याजाची रक्कम एकदम वाढून जाते.

ग्राहक व्याजापोटी लाखोंचे नुकसान करुन घेतो. त्यामुळे ईएमआय कमी करण्याऐवजी इतर काही खर्च कमी करता येतील का? याचा सर्वप्रथम विचार करणे आवश्यक आहे. कारण पुढील 5 ते 10 वर्षां करीता व्याजाचा विचार करता ही रक्कम काही लाखांमध्ये जाते.