Dolly च्या चहावर बिल गेट्स पण फिदा, एक कटसाठी किती मोजाल? रोज अशी करतो कमाई

| Updated on: Mar 14, 2024 | 3:43 PM

Dolly Chaiwala Income | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नागपूरचा डॉली चायवाला एकदम चर्चेत आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स याने पण त्याला खास हैदराबाद येथे बोलावून चहाचा आस्वाद घेतला. डॉली एकदम प्रकश झोतात आला. त्याच्या एक कटची किती किंमत आहे माहिती आहे का?

Dolly च्या चहावर बिल गेट्स पण फिदा, एक कटसाठी किती मोजाल? रोज अशी करतो कमाई
Follow us on

नवी दिल्ली | 14 March 2024 : रंगीत चष्मा, चमकदार शर्ट, स्टायलिश हेअरकट, अशा युनिक अंदाजात डॉली’ चहावाला आज नागपूरच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी बिल गेट्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात डॉली त्यांना चहा देताना आणि ते त्याचा आस्वाद घेताना दिसतात. त्यानंतर हा चहावाला आहे तरी कोण, याचे सर्च वाढले. डॉली चहा विक्री करुन किती कमाई करतो याची पण अनेकांना उत्सुकता लागली आहे. डॉली किती शिकलेला आहे. त्याचे शिक्षण किती, त्याच्याकडे कोणती कार आहे इथपासून तर दिवसभरात तो किती कमाई करतो याची कोण उत्सुकता आहे.

सोशल मीडियावर लोकप्रिय

डॉली चहावाला नागपूरमधील सिव्हिल लाईन्समध्ये एक चहाची टपरी चालवतो. त्याच्या अतरंगी अंदाजाने तो चहा तयार करतो. तो नागपूरमध्ये अगोदर चर्चेत होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. त्याच्या अनोख्या स्टाईलने त्याला रजनीकांत स्टाईल चहा विक्रेता अशा नावाने पण ओळखतात. डॉली त्याच्या स्वॅगने समाज माध्यमांवर एकदम लोकप्रिय ठरला आहे. त्याच्या या चहाची चव दस्तूरखुद्द बिल गेट्सने पण चाखली आहे. तर हा किती कमाई करतो ते जाणून घ्या..

हे सुद्धा वाचा

डॉलीची एक दिवसाची कमाई तरी किती

IMDB Stars Portal नुसार, डॉली चहा विक्रीतून एका दिवसात 2500 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत कमाई करतो. डॉली एक कप चहाच्या विक्रीतून 7 रुपयांची कमाई करतो. तो दररोज जवळपास 400 कप चहा विक्री करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉलीची एकूण संपत्ती
10 लाख रुपये आहे.

इयत्ता 10 नंतर सोडले शिक्षण

डॉली चहावाला 16 वर्षांपासून नागपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. चहाच्या चक्करमध्ये त्याने शिक्षण अर्धवट सोडले. इयत्ता 10 नंतर त्याने शिक्षण सोडले. अनेक लोक त्याच्या चहाचे चाहते आहेत. चहाच्या टपरीतून तो चांगली कमाई करतो. बिल गेट्सने त्याच्या हातची चहा पिऊन, त्याला मनमुराद दाद दिल्यानंतर अनेक जण त्यांच्या टपरीवर खास चहा पिण्यासाठी येतात.

बिल गेट्स यांनी पोस्ट केला व्हिडिओ

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बिल गेट्स डॉली याला एक चहा देण्यास सांगतात. त्यानंतर डॉली त्याच्या खास शैलीत चहा तयार करतो. तो दूध, दुरुनच चहात ओततो, इतर मसाले सुद्धा दुरुनच पण अचूक पणे चहाच्या भांड्यात टाकतो. त्याची हेअरस्टाईल, डोळ्यावरचा चष्मा आणि हटके स्टाईल पाहण्यासाठी पण अनेक जण त्याच्या टपरीवर एक कट पिण्यासाठी येतात.