1 लिटर पेट्रोलमागे तेल कंपन्या किती रूपये कमवतात, ‘हा’ आकडा वाचून धक्का बसेल

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर किमान 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.तसेच काही राज्यांमध्ये इंधन 100-105 रुपये प्रति लिटर किमतीत विकले जाते. आज आपण पेट्रोलियम कंपन्यांच्या कमाईबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

1 लिटर पेट्रोलमागे तेल कंपन्या किती रूपये कमवतात, हा आकडा वाचून धक्का बसेल
Petro Diesel price
| Updated on: Aug 27, 2025 | 5:14 PM

रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लावला आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांना असं वाटत आहे की भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून मोठ्या प्रमाणात पैसे वाचवत आहे. आज आपण सरकारी तेल कंपन्यांबाबत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या कंपन्या सामान्य लोकांना 1 लिटर पेट्रोल आणि डिझेल विकून किती कमाई करतात? या प्रश्नाचेही उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रति लिटर किमान 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.तसेच काही राज्यांमध्ये इंधन 100-105 रुपये प्रति लिटर किमतीत विकले जाते. त्यामुळे सामान्य जनता नेहमी महागाईबाबत सरकारवर टीका करत असते. आज आपण पेट्रोलियम कंपन्यांच्या कमाईबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

1 लिटर पेट्रोल आणि डिझेलमागे किती कमाई होते?

समोर आलेल्या एका अहवालानुसार 1 लिटर पेट्रोल आणि डिझेलमागे पेट्रोलियम कंपन्यांना होणाऱ्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्या 1 लिटर पेट्रोलमागे 11.2 रुपये कमाई करतात, तसेच एक लिटर डिझेलमागे प्रति लिटर 8.1 रुपया कमाई होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत $70 च्या खाली असल्याने पेट्रोलियन कंपन्यांच्या कमाईत ही वाढ झालेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली असली तरी भारतातील सामान्य लोकांना त्याचा फायदा झालेला नाही. कारण सरकारकडून इंधनाच्या किंमतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याआधी 2024 मध्ये इंधनाच्या दरात कपात झाली होती, मात्र त्यानंतर आतापर्यंत इंधनाच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

देशातील विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे?

भारतातील प्रत्येक राज्यात इंधनाची किंमत वेगवेगळी आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि डिझेलची किंमत 92.2 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. मुंबईत पेट्रोल 103.50 रुपये आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच बरोबर चेन्नईत पेट्रोलची किंमत 100.80 रुपये आणि डिझेलची किंमत 92.39 रुपये प्रति लिटर आहे.