AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan Trap : कर्जामुळे पगार झाला की लगेच संपून जातो? अशा पद्धतीने व्हा कर्जमुक्त; तीन ट्रिक वापरल्यास…

आजकाल कर्ज अगदी सहज उपलब्ध आहे. याच कारणामुळे अनेकजण कर्जाच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Loan Trap : कर्जामुळे पगार झाला की लगेच संपून जातो? अशा पद्धतीने व्हा कर्जमुक्त; तीन ट्रिक वापरल्यास...
loan trapImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2026 | 8:04 PM
Share

How To Get Free From Loan : आजकालची वाढती महागाई, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च यासह अचानक आलेली वैद्यकीय आणीबाणी या सर्व कारणांमुळे आपले खर्च वाढलेले आहेत. अनेकदा हा खर्च भागवण्यासाठी आपण वैयक्तिक कर्जाची मदत घेतो. परंतु आपण या चक्रव्यूहात अडकून पडतो. कालांतराने कर्जाची परतपेड एवढी अवघड होऊन जाते की आलेला पगार पुढच्याच काही दिवसांत संपून जातो. त्यामुळेच तुमच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी योग्य नियोजन आखणे गरजेचे आहे. तुमच्यावर असलेल्या कर्जातून लवकरात लवकर कसे मुक्त व्हावे हे जाणून घेऊ या….

प्रत्येक कर्जाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला

तुमच्या डोक्यावर वेगवेगळ्या कर्जाचं ओझं असेल तर त्या प्रत्येक कर्जाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असायला हवा. उदाहरणार्थ गृहकार्जावरील व्याजदर कमी असतो. तर क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही घेतलेल्या वैयक्तिक कर्जावरील व्याजाचा दर हा खूप जास्त असतो. त्यामुळे तुमच्यावर असलेल्या कर्जाची यादी तयार करा आणि अशा कर्जाचा व्याजदर आणि ईएमआय यावर लक्ष द्या. जास्त व्याजदर असणाऱ्या कर्जाची लवकर परतफेड करण्याचा प्रयत्न करा.

व्याजदर जास्त असणाऱ्या कर्जाची अगोदर परतफेड करावी

तुम्ही क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे काढलेले असतील तर तुम्ही अगोदर या पैशांची परतफेड केली पाहिजे. या महिन्याच्या कर्जाफेडीची रक्कम पुढच्या महिन्यावर ढकलू नये. दोन ते तीन टप्प्यांत क्रेडिट कार्डच्या मदतीने घेतलेल्या पैशांची परतफेड करावी. तसेच तुम्ही वैयक्तिक कर्ज घेतलेले असेल तर अशा कर्जाचा व्याजदरही जास्त असतो. असे वैयक्तिक कर्जही लवकरात लवकर संपवून टाकावे.

प्रत्येक महिन्याचा खर्च किती, याचा हिसोब करावा

कधीकधी पगार कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती होते. त्यामुळे तुम्ही महिन्याला किती पैसे खर्च करताय, याचा हिशोब करावा. प्रत्येक महिन्याला पैसे नेमके कुठे जात आहेत, याची नोंद करावी. यामुळे तुम्ही वायफळ कुठे खर्च करत आहात का? हे समजते आणि पैसे खर्च होत नाहीत.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.