बँकेला ATM साठी जागा भाड्याने द्या; घरबसल्या चांगली कमाई करा

| Updated on: Jul 04, 2021 | 2:28 PM

Bank ATM | प्रमुख रस्त्यावरील जागेला बँकांकडून प्राधान्य दिले जाते. याशिवाय, वीज कनेक्शन, बाहेर उभं राहण्यासाठी जागाही गरजेची आहे.

बँकेला ATM साठी जागा भाड्याने द्या; घरबसल्या चांगली कमाई करा
एटीएम
Follow us on

मुंबई: हल्ली लोक बँकेत जाण्यापेक्षा रस्त्यात किंवा घराजवळील एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याला प्राधान्य देतात. याच ATM च्या माध्यमातून तुम्ही चांगले पैसेही कमावू शकता. सध्या कोरोना संकटामुळे अनेक व्यवसाय ठप्प असल्याने व्यावसायिक गाळ्यांसाठी भाडेकरू मिळेनासे झाले आहेत. अशावेळी तुम्ही कोणत्याही बँकेच्या ATM ला जागा देऊन चांगली कमाई करु शकता. (How to rent your place for bank ATM)

बँकांना आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी ठिकठिकाण ATM मशिन्स उभारण्याची गरज असते. अशावेळी एखादी लहान जागाही ATM साठी पुरु शकते. त्यामुळे लहान व्यावसायिक गाळ्यासाठीही चांगले भाडे मिळू शकते.

ATM उघडण्यासाठी काय गरजेचे?

तुमच्याकडे स्वत:चा गाळा किंवा दुकान असणे गरजेचे आहे. या जागेत एटीएम मशिनचा सेटअप मावायला पाहिजे. एटीएम केंद्र सुरु करताना बँका अनेक गोष्टींचा विचार करतात. प्रमुख रस्त्यावरील जागेला बँकांकडून प्राधान्य दिले जाते. याशिवाय, वीज कनेक्शन, बाहेर उभं राहण्यासाठी जागाही गरजेची आहे.

ATM उघडण्यासाठी काय कराल?

तुमची जागा ATM उघडण्यासाठी बँकेला द्यायची असेल तुम्हाला थेट बँकेशी जाऊन किंवा ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधता येईल. त्यानंतर बँकेला जागेची माहिती द्यावी लागेल. अनेक एजन्सीजही ATM केंद्रे उभारतात. त्यांच्याशीही तुम्हाला संपर्क साधता येईल. तुमची जागा बघून पुढचे व्यवहार निश्चित केले जातात.

किती कमाई होते?

तुमच्या जागेत बँकेने ATM उघडल्यानंतर महिन्याला तुम्हाला भाडे दिले जाते. तर काही एजन्सीज संबंधित ATM मध्ये किती व्यवहार होतात, याआधारे तुम्हाला पैसे देतात. त्यामुळे ATM मध्ये जितकी जास्त ट्रान्झेक्शन्स होतील तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतील. लहान शहरांमध्ये एटीएमच्या जागेसाठी साधारण 10 हजार रुपये दिले जातात. तर शहरांमध्ये 30 हजार रुपयांपर्यंत भाडे मिळू शकते.

(How to rent your place for bank ATM)