पीपीएफ, एनपीएस किंवा सुकन्या समृध्दी योजना खाते बंद झालेय? मग असे करा सक्रिय, ही आहे प्रक्रिया
या योजनांवरील सुरक्षिततेची हमी, उत्तम परतावा आणि कर बचतीची हमी यामुळे या योजना सर्वात लोकप्रिय बनल्या आहेत. यात वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर गुंतवणूक केली जाऊ शकते. (If PPF, NPS or Sukanya Samruddhi Yojana account is closed, activate it, this is the process)

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि सुकन्या समृद्धी योजना – या सरकारी योजना आहेत ज्या बचतीच्या बाबतीत सामान्य लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या योजनांवरील सुरक्षिततेची हमी, उत्तम परतावा आणि कर बचतीची हमी यामुळे या योजना सर्वात लोकप्रिय बनल्या आहेत. यात वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु व्यस्त वेळापत्रकांमुळे या योजनेतील बचतीची अंतिम मुदत चुकली आहे. विशिष्ट कालावधीनंतर जर आपण या खात्यांमध्ये पैसे भरले नाही तर ते निष्क्रिय होतील. आपणाला पुन्हा ही खाती सक्रिय करू शकता. (If PPF, NPS or Sukanya Samruddhi Yojana account is closed, activate it, this is the process)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
– एका आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात किमान 500 रुपयांचे योगदान देणे आवश्यक असते. त्याची अंतिम तारीख प्रत्येक आर्थिक वर्षाची 31 मार्च आहे. – 31 मार्चपर्यंत पीपीएफ खात्यात किमान 500 रुपयांचे योगदान नसल्यास ते खाते निष्क्रिय होईल. – जोपर्यंत हे खाते पुन्हा सक्रिय केले जात नाही, तोपर्यंत यातून विड्रॉल करु शकत नाही. – हे खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला त्या वर्षासाठी 500 रुपये आणि 50 रुपये दंड भरावा लागेल. – पीपीएफवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळते. मॅच्युरिटी वेळी मिळणारी रक्कम पूर्णपणे कर मुक्त आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना
– राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची सदस्यता घेण्यासाठी वर्षाकाठी किमान योगदान द्यावे लागेल. विद्यमान नियमांनुसार एनपीएसच्या टियर-1 खात्यात किमान 1000 रुपये देणे आवश्यक आहे. – कोणत्याही एका आर्थिक वर्षात या खात्यात पैसे न भरल्यास एनपीएस खाते निष्क्रिय होईल. – पुन्हा एनपीएस खाते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला वर्षाकाठी 100 रुपये दंड भरावा लागेल. त्याशिवाय दरवर्षी किमान योगदानदेखील द्यावे लागेल. – एनपीएस खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, पॉईंट ऑफ-प्रेझेन्स शुल्क देखील द्यावे लागेल. – टियर-2 साठी किमान योगदानाचे बंधन नाही. परंतु, जर टायर -1 खाते फ्रीज झाले तर टियर -2 देखील आपोआप फ्रीज होईल. – एनपीएस हा एक ऐच्छिक पेन्शन फंड आहे, जो भारतीय निवृत्तीवेतन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियमित केला जातो. एखादी व्यक्ती आर्थिक वर्षामध्ये किमान सहा हजार रुपयांच्या योगदानासह त्याची सुरुवात करू शकते. – एनपीएस एक प्रकारची एन्युटी योजना आहे ज्यात वर्षाला चक्रवाढ व्याज मिळते. सर्वसाधारणपणे यावर 9 ते 11 टक्के व्याज मिळते.
सुकन्या समृद्धी योजना
– सुकन्या समृध्दी योजना खात्यात आर्थिक वर्षात किमान 250 रुपयांचे योगदान देणे बंधनकारक आहे. – जर एखाद्या आर्थिक वर्षात या खात्यात किमान योगदान दिले नाही तर सुकन्या समृद्धी योजना खाते निष्क्रिय होते. – जुने सुकन्या समृद्धी योजना खाते 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधीपूर्वी कधीही पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. – सुकन्या समृध्दी योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी किमान 250 रुपये आणि वर्षाकाठी 50 रुपये दंड भरावा लागेल. – सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळते. पालक आपल्या मुलीच्या नावे हे खाते उघडू शकतात. – हे खाते 10 वर्षाखालील मुलींसाठी उघडले जाऊ शकते. या खात्याची मॅच्युरिटी 21 वर्षे किंवा 18 वर्षानंतर मुलीच्या लग्नापर्यंत आहे. (If PPF, NPS or Sukanya Samruddhi Yojana account is closed, activate it, this is the process)
कोंबडी आणि अंड्यावर कोरोनाचा परिणाम; भाव गडगडले, पटापट तपासा नवे दर#businessnewsinmarathi #EggPrice #EggPriceinIndiahttps://t.co/D1YFymuyNW
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021
इतर बातम्या
भारताचा स्पाय, जो पाकिस्तानच्या आर्मीत मेजर बनला – एक था ब्लॅक टायगर….!
MTNLमध्ये अभियंता ते माजी केंद्रीय मंत्री, जाणून घ्या कोण आहेत खासदार अरविंद सावंत?
