तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास 2 लाखांचा मोफत लाभ अन् 4 लाखांचा फायदा, पण कसा?

4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे.

तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास 2 लाखांचा मोफत लाभ अन् 4 लाखांचा फायदा, पण कसा?
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 8:15 AM

नवी दिल्ली : तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास तुम्ही 2 लाख रुपयांच्या लाभासह 4 लाख रुपयांचा लाभ मोफत मिळवू शकता. असे बरेच ग्राहक आहेत, ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की तुम्‍हाला केवळ 342 रुपये प्रतिवर्ष भरून 4 लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ कसा मिळवता येईल, म्‍हणजे 28 रुपये प्रति महिना भरावे लागतील, सोबत 2 लाख रुपयांचा ‍फायदा मोफत मिळेल. चला तर मग जाणून घेऊया बँकेच्या या योजनेबद्दल…

2 लाखांचा लाभ मोफत कसा मिळवायचा?

जन धन ग्राहकांना ही सुविधा बँकेने दिलीय. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे.

4 लाखांच्या फायद्यासाठी काय करावे?

4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे.

केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखांचा PMJJBY लाभ

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) साठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेंतर्गत व्यक्तीला लाईफ कव्हर मिळते. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. PMSBY ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

अटल पेन्शन योजना

कमी गुंतवणुकीवर पेन्शनची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

संबंधित बातम्या

फक्त 5 हजारांत पोस्टाची फ्रँचायझी मिळवा, पहिल्या दिवसापासून भरघोस कमाई, प्रक्रिया काय?

Muhurat Trading Updates: अखेर मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा दिवस

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.