Liquor: 180 रुपयांच्या दारुची धमाल, हिवाळ्यात मद्यपींच्या उड्या; 17,90,000 बॉटलची झटक्यात विक्री
Imperial Blue Whisky: कंपनीच्या माहितीनुसार, इम्पिरिअल ब्लू ब्रँडवर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. तिलकनगर पूर्वी इम्पिरिअल ब्लू ब्रँडची मालकी ही फ्रान्सची कंपनी पर्नो रिका हिच्याकडे होती. या ब्रँडच्या दारुची सर्वाधिक विक्री ही भारतातच होते. काय खास आहे या ब्रँडमध्ये?

Imperial Blue Whisky: हिवाळा आला की रमच्या विक्रीत सर्वाधिक वाढ होते. पण मद्यप्रेमींना यावेळी या ब्रँडने मोहात टाकले आहे. भारतातील लोकप्रिय दारुचा ब्रँड Imperial Blue ने एक मोठा कारनामा करून दाखवला आहे. या ब्रँडने विक्रीचा नवीन रेकॉर्ड करून दाखवला आहे. इम्पिरिअल ब्लू ही पूर्वी परदेशी कंपनी होती. पण कंपनीला तिलकनगर इंडस्ट्रीने खरेदी केले आहे. हा सौदा जवळपास 4000 कोटी रुपयात झाला होता. तिलकनगर इंडस्ट्रीजने इम्पिरिअल ब्लूचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले आहेत. या कंपनीने या हिवाळ्यात जवळपास 1.79 दक्षलक्ष ( जवळपास 17,90,000) बॉटलची विक्री केली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड मानल्या जातो.
तिलकनगर इंडस्ट्रीजने ही कंपनी ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच ही आकडेवारी समोर आली आहे. तिलकनगर इंडस्ट्रीजने इम्पिरिअल ब्लू ब्रँडच्या विक्रीत आघाडी घेतली आहे. इम्पिरिअल ब्लूशिवाय तिलकनगर इंडस्ट्रीजकडे इतर अनेक ब्रँडस आहेत. विविध ब्रँड्सची या कंपनीने या हिवाळी हंगामात विक्री केली आहे. त्यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. कंपनीने दर्जा आणि पॅकेजिंगवर भर दिला. हिवाळ्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री मानल्या जात आहे.
कंपनीनुसार, इम्पिरिअल ब्लू ब्रँड पोर्टफोलिओत सहभागी करण्याचा निर्णय फायदेशीर ठरला. तिलकनगर कंपनीअगोदर या ब्रँडची मालकी ही फ्रान्सची कंपनी पर्नो रिकाकडे होती. या ब्रँडची सर्वाधिक विक्री ही भारतातच होते. Whisky कॅटेगिरीती हा देशातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड ठरला आहे. प्रत्येक वर्षी Imperial Blue Whisky चे 2.24 कोटी केसची विक्री होते. भारतीय व्हिस्की बाजारात या ब्रँडची हिस्सेदारी जवळपास 9% इतकी आहे. भारतात दरवर्षी व्हिस्कीचे जवळपास 7.9 कोटी केस विक्री होतात.
इम्पिरिअल ब्लूची किंमत किती?
इम्पिरिअल ब्लूची किंमत लोकप्रिय होण्यामागे किंमतीचे मोठे गणित आहे. देशाची राजधानी दिल्लीत इम्पिरिअल ब्लूच्या 180 ML ची किंमत केवळ 180 रुपयांच्या जवळपास आहे. या बॉटलची किंमत जवळपास 600 रुपये इतकी आहे. तिलकनगर इंडस्ट्रीजने जेव्हा हा ब्रँड खरेदी केला तेव्हा हा करार, सौदा भारतातील सर्वात मोठा मानल्या गेला. या ब्रँडमुळे लिकर इंडस्ट्रीजमध्ये कंपनीचा टक्का वाढला आहे.
