AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 8 व्या वेतन आयोगात हटवले जाऊ शकतात हे भत्ते !

तज्ज्ञांच्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात काही भत्त्यांवर संक्रात येण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्याचे थेट नुकसान होऊ नये यासाठी बेसिक वेतन आणि अन्य सोयीसुविधात वाढ होऊ शकते असेही म्हटले जात आहे.

केंद्र कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 8 व्या वेतन आयोगात हटवले जाऊ शकतात हे भत्ते !
| Updated on: Aug 28, 2025 | 9:29 PM
Share

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात सतत नवीनवीन माहिती येत आहे. आठव्या वेतन आयोगात किती लाभ होणार आणि कसा लाभ होणार या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे. आता नव्या माहिती नुसार आठव्या वेतन आयोगातील काही भत्त्यांना संपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सातव्या आयोगात ज्याप्रमाणे केले होते तसेच काहीसे केले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि सुविधांवर परिणाम होणार आहे.

काय आहे बदल ?

७ व्या वेतन आयोगात सरकारने अनेक छोटे – मोठे भत्ते हटवले होते. आणि त्यांच्या जागी मोठ्या वर्गवारीतील भत्त्यांचा समावेश केला होता. यामुळे भत्त्यांची संख्या कमी झाली असली तर पे सिस्टीमला सोपे आणि पारदर्शक बनवले जाऊ शकेल. आता बहुप्रतिक्षित आठव्या वेतन आयोगाबाबत देखील अशाच प्रकारची पावले सरकारकडून उचलली जाऊ शकतात. आता आठव्या वेतन आयोगात अशाच प्रकारची पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की जर काही भत्ते हटवले जात असले तरी कर्मचाऱ्यांचे थेट नुकसान होऊ नये यासाठी बेसिक वेतन वा अन्य सुविधेत वाढ होऊ शकते असे म्हटले जाते. सरकारने सध्या अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतू कर्मचाऱ्यांच्या आणि पेशनर्सना या संदर्भात मोठी उत्सुकता आहे.

कोणत्या भत्त्यांवर पडणार परिणाम

मीडिया रिपोर्टच्या मते, अंदाज असा लावला जात आहे की ट्रॅव्हल अलाऊन्स ,स्पेशल ड्यूटी अलाऊन्स, छोट्या स्तरावरील रिजनल भत्ते आणि काही विभागीय अलाऊन्सना संपवले जाऊ शकते. वास्तविक, असा अंदाज लावला जात आहे की शेवटच्या काही विभागीय अलाऊन्सला समाप्त केले जाऊ शकतो. असे असले तरी या संदर्भात सरकारकडून काही अधिकृतपणे माहिती पुढे आलेली नाही.

टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित होईपर्यंत …

कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे की 8 व्या वेतन आयोगाने केवळ भत्त्यांमध्ये बदल केलेला नाही , तर महागाई भत्ता ( DA),पेन्शन आणि अन्य लाभांमध्येही सुधारणा होऊ शकते. येत्या काही महिन्यात सरकारच्या वतीने टर्म्स आणि रेफरन्स (ToR) निश्चित होईपर्यंत चित्र आणखी स्पष्ट होऊ शकते.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.