जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?

31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नाहीत. पण यासाठी त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:57 AM, 18 Dec 2020
जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?

नवी दिल्ली : 2020 हे वर्ष आता संपणार आहे. त्यामुळे आता आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीखही जवळ आली आहे. ज्यांनी आयटीआर दाखल केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आयटीआर दाखल करावा लागणार आहे. खरंतर, असे बरेच लोक आहेत जे काही कारणामुळे 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकत नाहीत. पण यासाठी त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या बाबतीतही असं असेल, तुम्ही वेळेवर आयटीआर दाखल करू शकत नसाल तर यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. (income tax return filing 31 december last date for itr filing know all rules and last date)

खरंतर, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. आयटीआर दरवर्षी 30 जुलैपर्यंत दाखल करायची होती, परंतु यावेळी ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोकांना 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे आयटीआर दाखल करण्यास तुम्ही सक्षम नसाल तर घाबरून जाण्याचं काही काम नाही. चार्टर्ड अकाउंटंट सौरभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत कोणतीही अडचण नाही.

31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास काय कराल?

जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करण्यास सक्षम नसाल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हो आता तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत आयटीआर दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे शक्य झालं नाही तर तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत फाइल करू शकता. मार्च अखेरपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल करू शकता.

किती आहे दंड ?

दंड हा वेगवेगळ्या आयटीआरवर अवलंबून असतो. हा 1000 ते 5000 रुपयांपर्यंतही असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत दंड भरून आयटीआर भरावा लागेल. जर तुम्ही ठरलेल्या तारखेनंतर आयटीआर दाखल करत असाल तर तुम्हाला वेगळ्या कागदपत्रांची गरज नाही. नियमित प्रक्रियेनुसार तुम्ही आयटीआर दाखल करू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला शेवटच्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाची माहिती अगदी अचूकपणे भरावी लागेल. (income tax return filing 31 december last date for itr filing know all rules and last date)

इतर बातम्या –

Gold Silver Rate | सोने 50 हजारांच्या पार, चांदीचीही लखलख, जाणून घ्या दर

Tissue Paper चा व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान; कमवाल लाखो रुपये

(income tax return filing 31 december last date for itr filing know all rules and last date)