Tissue Paper चा व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान; कमवाल लाखो रुपये

तुम्ही अगदी कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करु शकता. | tissue paper

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:25 AM, 18 Dec 2020
Tissue Paper चा व्यवसाय सुरु करा; सरकारकडून अनुदान; कमवाल लाखो रुपये

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात कागदी नॅपकिन्सचा (Tissue Paper) वापर वाढला आहे. त्यामुळे साहजिकच Tissue Paper च्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. घर, हॉटेल्स ते अगदी कार्यालयांमध्ये Tissue Paper ही जणू जीवनावश्यक बाब झाली आहे. कोरोनाच्या काळातील स्वच्छतेच्या सोवळ्यामुळे Tissue Paper चे महत्त्व आणखीनच वाढले आहे. त्यामुळे Tissue Paper चा वापर केवळ शहरांपर्यंत मर्यादित न राहता अगदी ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. (how to start tissue paper making business napkin manufacturing)

त्यामुळेच आगामी काळात टिश्यू पेपरची निर्मिती हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. तुम्ही अगदी कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करु शकता. याचा लघुद्योगात समावेश असल्याने या व्यवसायासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते.

या उद्योगासाठी किती भांडवल लागते?

टिश्यू पेपरच्या निर्मितीचा कारखाना सुरु करण्यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपयांचे भांडवल लागते. पंतप्रधान मुद्रा योजनेतंर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करु शकता. तुम्हाला अगदी कमी व्याजदराने कर्ज मिळेल. तुमच्याकडे 3.50 लाखांची रक्कम असल्यास बँक तुम्हाला टर्म लोन म्हणून 3.10 लाख तर वर्किंग कॅपिटल म्हणून 5.30 लाख रुपयांचे कर्ज देऊ शकते.

जागा आणि उत्पादन

टिश्यू पेपरच्या निर्मितीचा कारखाना सुरु करण्यासाठी तुमची स्वत:ची जागा किंवा इमारत असल्यास उत्तम. अन्यथा तुम्ही एखादी जागा भाड्याने घेऊ शकता. उत्पादनाच्याबाबती बोलायचे झाल्यास तुम्ही प्रत्येकवर्षी 1.50 लाख किलो टिश्यू पेपर्सची निर्मिती करू शकता. त्यानंतर तुम्ही प्रतिकलो 60 ते 65 रुपये दराने टिश्यू पेपर्स विकू शकता. या गतीने गेल्यास वर्षाकाठी तुमच्या व्यवसायात 1 कोटीची उलाढाल होऊ शकते.

कोणत्या गोष्टींवर करावा लागतो खर्च?

टिश्यू पेपर तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रासाठी 4.50 लाख रुपये
कच्च्या मालासाठी प्रत्येक महिन्याला साधारण 7 लाख रुपये
21 जीएसएम टिश्यू पेपरच्या 12.5 टनासाठी 7 लाख रुपये
शाई आणि कंझ्युमेबल गोष्टींसाठी 10 हजार रुपये
पँकिंग मटेरियलसाठी 3000 रुपये
दैनंदिन खर्चासाठी (Working Captial) महिन्याला 7.50 लाख रुपये
कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज, वाहतूक, टेलिफोन, स्टेशनरी आणि इतर देखभालीसाठी जवळपास 50 ते 60 हजार
एकूण व्यवसायासाठी 12 लाख रुपये

संबंधित बातम्या:

गोमाता – तगडा बँक खाता, गायीच्या शेणापासून ‘असा’ कमवा बक्कळ पैसा

पोस्टात फक्त 500 रुपयांत खातं उघडा; ‘या’ तीन योजनांमध्ये बँकेपेक्षा जबरदस्त फायदा

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत

(how to start tissue paper making business napkin manufacturing)