AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करदात्यांसाठी आनंदाची बातमी, Income Tax Portal मधील तांत्रिक अडचणी दूर; आतापर्यंत 2 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल

Income Tax portal | 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पोर्टलवर दोन कोटीहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी आयटीआर 1 आणि 4 चे प्रमाण 86 टक्के आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत 13.44 कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी 'लॉग इन' केले आहे. तब्बल 54.70 लाख करदात्यांनी त्यांचे पासवर्ड पुनर्प्राप्त करण्याची सुविधा वापरली आहे.

करदात्यांसाठी आनंदाची बातमी, Income Tax Portal मधील तांत्रिक अडचणी दूर; आतापर्यंत 2 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 15, 2021 | 10:59 AM
Share

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून करदात्यांना नाकीनऊ आणणाऱ्या नव्या Income Tax पोर्टलमधील तांत्रिक अडचणी अखेर दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता करदात्यांना पूर्वीप्रमाणे कराचा भरणा करता येईल. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यात आले आहेत आणि नवीन आयटी पोर्टलच्या कामगिरीशी संबंधित समस्या बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात आल्या आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना आर्थिक वर्ष 2020-21 (एप्रिल 2020-मार्च 2021) साठी प्राप्तिकर विवरणपत्र लवकरात लवकर दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

सीबीडीटीने एका निवेदनात म्हटले आहे की, “2021-22 या आर्थिक वर्षासाठी पोर्टलवर दोन कोटीहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी आयटीआर 1 आणि 4 चे प्रमाण 86 टक्के आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत 13.44 कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी ‘लॉग इन’ केले आहे. तब्बल 54.70 लाख करदात्यांनी त्यांचे पासवर्ड पुनर्प्राप्त करण्याची सुविधा वापरली आहे.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा सुरु नव्हत्या. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात होता.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.  पोर्टल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2019 ते जून 2021 या काळात इन्फोसिस कंपनीला 164.5 कोटी रुपये अदा केले होते.

नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 90 तांत्रिक अडचणी

केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या आयकर पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे करदाते प्रचंड हैराण झाले होते. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 90 तांत्रिक त्रुटी असल्याची माहिती पुढे आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?