Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

Income Tax Portal | निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे. तसेच करदात्यांना येणाऱ्या अडचणींविषयी निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली.

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या...
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना नव्या Income Tax E-Filing पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यास सांगितले. त्यावर इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांनी ITR बघणे, इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासह पाच तांत्रिक गोष्टी आठवडाभरात निकालात काढण्याचे आश्वासन दिले. या बैठकीवेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह E-Filing Portal चा आढावा घेतला. (Union minister Nirmala Sitharaman spoke to infosys to remove flaws in new Income Tax E-Filing Portal)

यावेळी निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या. आयकर पोर्टल हे वापरण्याजोगे आणि सुलभ करावे. करदात्यांना हे पोर्टल वापरताना चांगला अनुभव मिळाला पाहिजे. तसेच करदात्यांना येणाऱ्या अडचणींविषयी निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख आणि इतर अधिकाऱ्यांनी हे आक्षेप नोंदवून घेतले. नव्या पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच इन्फोसिसकडून काम सुरु असणाऱ्या गोष्टींविषयी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना माहितीही दिली. या बैठकीला काही करदाते, लेखापरीक्षकांची शीर्षस्थ संस्था ICAI चे पदाधिकारी, ऑडिटर्स आणि काही सल्लागारही उपस्थित होते.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

इन्फोसिस कंपनीला देण्यात आले होते प्रोजेक्ट

मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

New e-filing portal: नव्या टॅक्स पोर्टलमुळे करदाते हैराण; एक-दोन नव्हे तर 40 तांत्रिक अडचणी

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

इन्कम टॅक्स विभागाचं नव पोर्टल पहिल्या दिवशी डाऊन, निर्मला सीतारमण यांनी इन्फोसिसला विचारला जाब

(Union minister Nirmala Sitharaman spoke to infosys to remove flaws in new Income Tax E-Filing Portal)