सोने,चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

सोमवारी पुन्हा एकदा सोन्या, चांदीच्या किमतीमध्ये बदल झाला आहे. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली असून, भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 49,163 इतका झाला आहे. तर चांदीचे भाव देखील वधारले आहेत

सोने,चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर
प्रातिनिधिक छायाचित्र
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Nov 15, 2021 | 3:24 PM

मुंबई – सोमवारी पुन्हा एकदा सोन्या, चांदीच्या किमतीमध्ये बदल झाला आहे. सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली असून, भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा 49,163 इतका झाला आहे. तर चांदीचे भाव देखील वधारले असून, चांदी 66488 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 49,163 इतके आहेत. तर 22 कॅरट सोन्याचे दर 48966 रुपये प्रति तोळा इतके आहेत.

सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार

शुक्रवारी सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये तेजी दिसून आली. शुक्रवारच्या तुलनेत सोने 160 रुपयांनी महाग झाले आहे. सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने चढ उतार दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोने प्रति तोळा 56 हजारांवर पोहोचले होते. मात्र त्यानंतर सातत्याने त्यामध्ये घसरनच होत आहे. ऑक्टोबरमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 45 हजारांच्या आसपास होते, मात्र दिवाळीच्या काळात काही प्रमाणात त्यामध्ये वाढ झाली असून, ते 49 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत.

क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक वाढली

दरम्यान सध्या सोन्याचे दर प्रचंड अस्थिर आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होताना दिसत आहे. गुंतवणूकदार सोन्यामध्ये केलेली आपली गुंतवणूक काढून, क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी करत आहेत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचे दर वाढले आहेत. सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जोखमी घ्यावी लागते. मात्र सोन्याच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सीमध्ये  जोखीम कमी असल्याने क्रिप्टोकरन्सी खरेदीचा कल वाढला आहे.

संबंधित बातम्या 

सर्वसामान्यांना झटका! घाऊक महागाईमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या का वाढले वस्तुंचे दर?

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आठवडाभर दिवसातून सहा तास बंद राहणार रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें