प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आठवडाभर दिवसातून सहा तास बंद राहणार रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आठवडाभर दिवसातून सहा तास बंद राहणार रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग

नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे  मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या  रेल्वे प्रवासी आरक्षण यंत्रणा अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 21 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असे सात दिवर रेल्वे तिकीट सेवा रात्री सहा तास बंद राहणार आहे. 21 तारखेनंतर पुन्हा एकदा तिकीट सेवा सुरळीत सुरू होईल.

माहिती अपडेट करण्यासाठी निर्णय

सध्या मेल, एक्सप्रेस आणि कोरोना काळात असलेली ट्रेनची संख्या आणि आता नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ट्रेन यांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली दिवसातून काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ही सर्व कामे रात्री केली जाणार आहेत. पुढील सात दिवस रेल्वेची ही यंत्रणा रात्री सहा तासांसाठी बंद असेल. याकाळात नागरिकांना तिकीट बूक करणे,  तिकीट रद्द करणे, ट्रेनची चौकशी करणे यासारख्या गोष्टी करता येणार नाहीत. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार या सहा तासांच्या कालावधीत रेल्वेशी संबंधित डेटा अपडेट करण्याचे काम करण्यात येणार आहे.

148 ट्रेनचे नंबर बदलणार 

दरम्यान भारतीय रेल्वे विभागाकडून कोरोना आणि सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर काही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या, आता या ट्रेनचा स्पेशल दर्जा काढून घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याचबरोबर तब्बल 148 ट्रेनचे नंबर बदलण्यात येणार आहेत. ही सर्व माहिती अपडेट करण्यासाठीच पुढील सात दिवस रात्री सहा तास रेल्वेची आरक्षण प्रणाली बंद राहणार आहे.

 

संबंधित बातम्या 

शरद पवारांना शिक्षण खातं अवघड जागेचं दुखणं का वाटलं?, चव्हणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा?; असा किस्सा जो कुणालाच माहीत नाही

Gujarat ATS | पुन्हा गुजरातमध्येच ड्रग्ज, ATS ची मोठी कारवाई, पाकिस्तानातून आलेले 600 कोटीचे ड्रग्ज जप्त, कनेक्शन काय?

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI