आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल,डिझेल काही प्रमाणात स्वस्त होईल अशी अपेक्षा होती, मात्र भारतामधील दर हे स्थिर आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर
पेट्रोल-डिझेल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Nov 15, 2021 | 11:39 AM

नवी दिल्ली  – आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने जगभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने भारतात पेट्रोल,डिझेल काही प्रमाणात स्वस्त होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. भारतातील प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.97 तर डिझेल प्रति लिटर 86.67 रुपयांना मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर जैसे थे आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भारतात पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर  राज्य सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे दर कमी करावेत असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले होते. केंद्राच्या या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक राज्यांनी हॅटमध्ये कपात करत आपल्या राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले.

सर्वात स्वस्त पेट्रल,डिझेल पंजाबमध्ये 

दरम्यान केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच काही दिवसांमध्ये पंजाबच्या चन्नी सरकारने देखील आपल्या राज्यात पेट्रोलचे, डिझेलचे दर कमी केले. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर तब्बल 11.27 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 6.9 रुपयांची कपात केली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या सर्व राज्यांनी काही प्रमाणात पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या 

किड्स पॅन कार्ड कसे काढावे? काय आहेत त्याचे फायदे; जाणून घ्या

फक्त 10 हजारांत सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला 30000 रुपयांपेक्षा जास्तीची कमाई, पण कशी?

‘या’ बँकेच्या क्रेडिट कार्डाद्वारे सिनेमाची तिकिटे बुक करण्यावर 50 टक्के सूट, जाणून घ्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें