AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : येस, गेल्या 11 महिन्यांचा असाही रेकॉर्ड! पेट्रोल-डिझेलमध्ये नाही झाली मोठी दरवाढ

Petrol Diesel Price Today : देशात काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलने 60 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर मोदी सरकारच्या काळात भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. पण गेल्या 11 महिन्यांत या सरकारने नवीन रेकॉर्ड केला आहे.

Petrol Diesel Price Today : येस, गेल्या 11 महिन्यांचा असाही रेकॉर्ड! पेट्रोल-डिझेलमध्ये नाही झाली मोठी दरवाढ
दरवाढ नाही, भाव काय
| Updated on: Apr 28, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाने (Crude Oil Price) अनेक उलटफेर पाहिले. 140 डॉलर प्रति बॅरलपर्यंत कच्चा तेलाने मजल मारली. तर ते पार 74 डॉलर प्रति बॅरलच्या ही निच्चांकी पातळीवर जाऊन आले. आता पुन्हा क्रूड ऑईलने उचल खाल्ली आहे. मे महिना आता दोन-तीन दिवसांवर आहे. हा महिना सर्वच दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कारण ओपेक प्लस संघटनने कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरु होईल. तर गेल्या वर्षी 22 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) ऐतिहासिक निर्णय घेतला होता. पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Price)उत्पादन शुल्कात कपातीचा निर्णय झाला होता. त्यानंतर देशात इंधन किंमती न वाढण्याचा नवीन रेकॉर्ड झाला आहे.

रोषानंतर नरमले सरकार काँग्रेसच्या काळात देशात पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी प्रति लिटर 60 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर मोदी सरकारच्या काळात इंधनाचे दर सूसाट सूटले. हा हा म्हणता म्हणता किंमती प्रति लिटर 100 रुपयांच्या घरात आणि पुढे तर थेट 120 रुपयांच्या टप्प्यात इंधन जाऊन बसले. जनतेने प्रचंड रोष व्यक्त केला. त्यानंतर मोदी सरकार नरमले. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 22 मे रोजी उत्पादन शुल्क घटविले. काही राज्यांनी पण मूल्यवर्धित करात कपात केली. पण त्यानंतर आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नाही. गेल्या 11 महिन्यांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे.

कच्चा तेलात नरमाई आज 28 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत दरवाढ झाली नाही. किंमती नरमल्या. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 74.74 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 78.39 डॉलर प्रति बॅरलवर होते.

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड होती.
  11. केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मोठी आर्थिक मदत केली

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.13 तर डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.57 तर डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.52 पेट्रोल आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.68 तर डिझेल 94.16 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.63 तर डिझेल 93.16 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.33 तर डिझेल 94.79 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.41 तर डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.38 आणि डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.60 रुपये तर डिझेल 93.12 रुपये प्रति लिटर

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?